Homeकोपरगावदोघी सख्या बहीणींनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल...

दोघी सख्या बहीणींनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री. मुकुंद मामा काळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कोपरगाव : – तालुक्यातील संवत्सर येथील वाघ कुटूंबातील कु. प्राजक्ता व दिव्या या दोघी बहिणींनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री. मुकुंद मामा काळे,श्री.दीनेश नाना बोरनारे व सौ. छायाताई मुकुंद काळे यांच्यावतीने या दोघींनी उल्लेखनीय यशसंपादन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थींनीच्या स्वगृही कुटुंबासमवेत शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन दि.२६ मे रोजी विशेष सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभ प्रसंगी श्री. मुकुंद मामा काळे, श्री. दिनेश नाना बोरनारे, सौ. छायाताई मुकुंदमामा काळे व वाघ परिवार उपस्थित होता. तसेच कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र परजणे साहेब, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना संचालक मा. श्री. बाळासाहेब शेटे साहेब, संवत्सर ग्रामपंचायत सदस्य श्री. महेश भाऊ परजणे, श्री. रामभाऊ कासार साहेब, श्री. संभाजी बोरनारे साहेब, भाजपा सचिव श्री. संदीप मैंद, सदस्य मनोज भाऊ शेटे, श्री. राजेंद्र आबा बोरनारे, श्री. मोहन निकम साहेब, श्री. दिलीपराव कासार यांनीही यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संवत्सर गावातील वाघ कुटुंबातील कु. प्राजक्ता रविंद्र वाघ हिने एन.पी.पी. कॉलेज संवत्सर येथे इयत्ता १२ वीमध्ये ७४.३३% गुण मिळवून महाविद्यालयात तिसरा क्रमांक प्राप्त केला तर कु. दिव्या राजेंद्र वाघ हिने जनता इंग्लिश स्कूल संवत्सर येथे इयत्ता १० वीमध्ये ८२.६०% गुण मिळवून शाळेत तिसरा क्रमांक पटकवून दोघीं बहीणींनी अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थासह पंचक्रोशितुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!