
पुणे विभागाकडून खेळताना यजमान अहिल्यानगरच्या खेळाडूंचे स्पर्धेत वर्चस्व
कोपरगाव:- अहिल्यानगर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (महाराष्ट्र राज्य), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (अहिल्यानगर), राज्य पेटांक्यु असोसिएशन फॉर महाराष्ट्र आणि अहिल्यानगर पेटांक्यु असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पेटांक्यु शालेय क्रीडा स्पर्धेचा थरार नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत पुणे विभागाने अष्टपैलू कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद (General Championship) आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे, पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करताना यजमान अहिल्यानगरच्या खेळाडूंनी मैदानावर आपले जोरदार वर्चस्व राखले.

भव्य उद्घाटन आणि बक्षीस वितरण २१ ते २३ मे दरम्यान येथील ‘अवतार मेहेरबाबा ट्रस्ट’च्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रातील एकूण आठ विभागांतील पाच प्रमुख संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
उद्घाटन व प्रमुख उपस्थिती स्पर्धेचे उद्घाटन अहिल्यानगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, मेहेरबाबा ट्रस्टचे कल्च्युरी, राज्य पेटांक्यु असोसिएशनचे महासचिव प्रदीप साखरे, अहिल्यानगर जिल्हा असोसिएशनचे सचिव व राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, अहिल्यानगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव शैलेश गवळी आणि कल्पेश भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
पारितोषिक वितरण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर आणि निवृत्त खुले कारागृह अधीक्षक कृष्णा बारगजे व श्रीमती मुक्ता कृष्णा बारगजे यांच्या हस्ते पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना चषक आणि मेडल देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी राष्ट्रीय पंच सुभाष उंबरे आणि प्रवीण बेलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
🏆 स्पर्धांचा अंतिम निकाल (वर्ष २०२५-२६) ही स्पर्धा मिक्स डबल, double, सिंगल, ट्रिपल आणि शूटिंग अशा विविध चुरशीच्या प्रकारांमध्ये खेळवण्यात आली.
अंतिम निकाल खालीलप्रमाणे राहिले: १ ) सिंगल गट (Single)
मुले प्रथम: अमरावती विभाग द्वितीय : नाशिक विभाग तृतीय : पुणे विभाग, मुली प्रथम: नाशिक विभाग द्वितीय: पुणे विभाग तृतीय: लातूर विभाग
२) डबल प्रकार (Double) मुले प्रथम: पुणे विभाग द्वितीय: नाशिक विभाग मुली प्रथम: पुणे विभाग द्वितीय: नाशिक विभाग तृतीय: अमरावती विभाग
3 ) ट्रिपल प्रकार (Triple) मुले प्रथम : पुणे विभाग द्वितीय: नाशिक विभाग मुली प्रथम: अमरावती विभाग द्वितीय: लातूर विभाग तृतीय: पुणे विभाग
४) शूटिंग प्रकार (Shooting) मुले प्रथम: पुणे विभाग द्वितीय: नाशिक विभाग मुली प्रथम: पुणे विभाग द्वितीय: नाशिक विभाग
🎖️ अंतिम सर्वसाधारण विजेतेपद पुणे विभागाने पटकावले तर
नाशिक विभाग द्वितीय व
अमरावती विभागाने तृतीय क्रमांक पटकावले.