
कोपरगाव : – सर्वधर्म फाऊंडेशनने आत्मा मालिक रूग्णालयाला कार्डियाक अॅम्ब्युलन्स भेट दिली. एका अर्थाने हा रूग्णसेवेचा वसा आहे. आत्मा मालिक माऊलींच्या कृपेने आत्मा मालिक रूग्णालयात हा वसा जपला जातो. हि कार्डियाक अॅब्म्युलन्स ह्रदयविकारग्रस्त रूग्णांना आपतकालीन परिस्थीतीत वरदान ठरेल. असे प्रतिपादन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले.

सर्वधर्म फाऊंडेशनच्या वतीने आत्मा मालिक रूग्णालयास कार्डियाक अॅम्ब्युलन्स भेट देण्यात आली. या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, वरिष्ठ व्यवस्थापक हिरामण कोल्हे तसेच सीईओ मयुर शिंदे आदि उपस्थित होते.
सुर्यवंशी म्हणाले, हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. अशा वेळी रुग्णाला तातडीने आणि सुरक्षितपणे उपचार केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी ही अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्स महत्वाची ठरेल. ॲम्ब्युलन्समध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, जीवनरक्षक सुविधा आणि प्रशिक्षित आरोग्यसेवकांची व्यवस्था आहे. रुग्णांना प्रवासादरम्यान आवश्यक उपचार देता येतील.
आत्मा मालिक रूग्णालय आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन सेवांच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी कार्यरत आहे. या कार्डियाक ॲम्ब्युलन्समुळे रुग्णसेवेला आणखी बळ मिळेल.
चौ
नंदकुमार सुर्यवंशी(अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट) – आत्मा मालिक गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने सर्वधर्म फाउंडेशनने आत्मा मालिक रूग्णालयाला दिलेली हि भेट महत्वाची आहे. हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. या सुविधेमुळे हृदयविकार, गंभीर आजार तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना अधिक जलद, सुरक्षित आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध होईल.