
कोपरगाव : – सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील दक्षिणगंगा गोदावरी काठावर वसलेल्या तीनखणी ब्रम्हलिन संत रामदासी महाराज मंदिरात गुरूपौर्णिमा उत्सवानिमीत्त गंगागिरी महाराज आश्रम (पुणतांबा) येथील प. पू. विजयानंदगिरी महाराज यांचे सुश्राव्य किर्तन २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यांत आले आहे.
ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या पदस्पशनि कोकमठाण क्षेत्र पावन झाले असुन त्यांनी गोदाकाठी अखंड जप-तप साधना, योग साधना केली असुन गेल्या ३६ वर्षापासुन या स्थानावर त्यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी पंचक्रोशीतील बालकांसह असंख्य भाविकांना सन्मार्ग दाखवत अध्यात्मीक संस्काराची शिकवण दिली. २९ जुलै रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत सौ. वैशाली व सुनिल रामदास लोंढे या उभयतांच्या हस्ते रामदासी महाराजांच्या मुर्तीस लघुरूद्राभिषेक घातला जाणार आहे. त्याचे पौरोहित्य प्रदीप पदे गुरूजी करणार आहेत. किर्तन सेवा आटोपल्यावर दुपारी १२ वाजता महाप्रसाद वाटण्यांत येणार आहे. कार्यकम यशस्वीतेसाठी रामदासीबाबा भक्त मंडळ प्रयत्नशिल आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या गुरूपौर्णिमा उत्सवासाठी सढळ हातान तन मन धनाने मदत करावी, किर्तन श्रवणासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यांत आले आहे.