Homeकोपरगावसह्याद्रीच्या पर्जन्यछायेतील दुष्काळी भागाला पावसाळ्यात पाटाचे पाणी मिळावे: कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे...

सह्याद्रीच्या पर्जन्यछायेतील दुष्काळी भागाला पावसाळ्यात पाटाचे पाणी मिळावे: कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

​कोपरगाव :- सह्याद्री पर्वताच्या पर्जन्यछायेच्या क्षेत्रात येणाऱ्या अहिल्यानगर, मान – दहिवडी (सातारा), सुपा (पुणे) यांसह इतर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विशेष निवेदनाद्वारे मागणी सादर करण्यात आली.

या निवेदनात पर्जन्यछायेतील दुष्काळी पट्ट्यासाठी पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्याचे (Flood Water/Surplus Water) जलसंपदा विभागामार्फत विशेष कायदेशीर नियोजन (Legal Water Allocation Policy) करण्याची मागणी करण्यात आली आहे.
​​भीषण वास्तव व दुष्काळी परिस्थिती: हा संपूर्ण पट्टा पर्जन्यछायेचा भाग असल्याने येथे मान्सूनचा पाऊस अत्यंत कमी पडतो. परतीच्या पावसाशिवाय या भागात पुरेसा पाऊस होत नाही. हा भाग बागायती आणि समृद्ध असल्याचा गैरसमज पसरवला जात असला, तरी वास्तव हे आहे की हा भाग वर्षानुवर्षे भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. उन्हाळ्यात ‘समन्यायी पाणी वाटप कायद्या’नुसार येथील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागते; परंतु पावसाळ्यात जेव्हा स्थानिक नद्या-नाले आणि कालव्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असते, तेव्हा मात्र या दुष्काळी पट्ट्याला पाटाचे पाणी दिले जात नाही. ऐन पावसाळ्यात उपलब्ध असणारे पाणी जर कायदेशीर नियमावली करून या भागाला मिळाले, तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सध्याच्या प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत हताश भावना निर्माण झाली आहे.

​प्रमुख मागण्या: 1. पर्जन्यछायेतील दुष्काळी पट्ट्यासाठी पावसाळ्यातील पाटाच्या पाण्याचे जलसंपदा विभागाकडून विशेष कायदेशीर नियोजन करण्यात यावे.

  1. पावसाळ्यात कालव्यांद्वारे पाणी सोडून या भागातील तलाव, विहिरी आणि बंधारे भरून घेण्याचे ठोस धोरण तातडीने आखण्यात यावे.
    ​निवेदन सादर करतेवेळी काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​नितीन शिंदे (काँग्रेस तालुकाध्यक्ष),​कैलास पंडोरे पैलवान, हशमभाई पटेल, सचिन होन, विजय सुधाकर जाधव, विष्णू पाडेकर, ​ज्ञानेश्वर भगत, राहुल गवळी, सोमनाथ पगारे, सोपान धेणक, सुभाष रणधीर, रौनक अजमेरे, ​पुष्पाताई भगत, राजुभाई पठाण, महादेव नाना जगताप, बाळासाहेब शिंदे, मयुर आव्हाड, ​ॲड. सौ. शीतल देशमुख, ॲड. ऋषीकेश पोकळे, मझर शेख, माझ मोहमद शेख, चंद्रहार जगताप आदींचा समावेश होता.​जलसंपदा मंत्र्यांनी या गंभीर समस्येकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी याप्रसंगी करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!