Homeकोपरगावउत्तरप्रदेशची कलाकार मंडळी कोपरगावकरांसाठी सादर करणार श्रीराम रामायण कथा.

उत्तरप्रदेशची कलाकार मंडळी कोपरगावकरांसाठी सादर करणार श्रीराम रामायण कथा.

कोपरगाव :-शहरातील गोरोबानगर येथील श्री संत गोरोबा काका मंदिर परिसरात रामभक्तांच्या वतीने श्रावण मासानिमित्त श्रीराम कथा रामायणाचे १० ते १६ ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री ८ ते १० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील धर्मप्रचारक रामायण रामकथा मंडळाचे पं. श्यामदासजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून तुलसीकृत रामायण तसेच प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवनचरित्रावर आधारित रामकथा भाविकांना ऐकावयास मिळणार आहे.

‘मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रजींच्या पावन गंगेसमान रामकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाविकांनी आपल्या परीने देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी कथा वाचक पं. श्यामदासजी महाराज तसेच उपाध्यक्ष पंडित एस. एस. तिवारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!