
कोपरगाव :- सालाबादप्रमाणे याही वर्षी भारतीय स्वातंत्रदिनानिमीत्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे झेंडावंदन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्रदिनाचे औचित्य साधत नयनमनोहर लायटिंगसह विविध रंगी फुलांची सजावट करण्यांत आली होती. प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी श्री. रमेश डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण विभागाच्या सर्व कर्मचा-यांनी बँडपथकाच्या तालावर ध्वजसंचलन परेड केली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी परेड निरीक्षण केले. कारखाना कार्यस्थळावर तिरंगा ध्वजासह रंगीबेरंगी विविध ध्वज लावण्यांत आले होते. ध्वजासमोर बहारदार रांगोळी काढण्यांत आली होती. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी तबला पेटीच्या तालावर बहारदार राष्ट्रगीत-ध्वजगीत सादर केले. यावेळी तोफेची सलामी देण्यात आली. भारत माता की जय घोषणेने संजीवनी परिसर दुमदूमुन गेला होता. कुंपणास तसेच झाडांना गेरू व पांढरा रंग दिल्याने टीप टॉप स्वच्छतेमुळे सर्वांचेच लक्ष वेधले होते.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री. बापूसाहेब बारहाते, राजेंद्र कोळपे, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, आप्पासाहेब दवंगे, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, रमेश घोडेराव, सौ. उषाताई संजय औताडे, सौ. सोनियाताई बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, माजी संचालक फकिरराव बोरनारे, जयराम पाटील गडाख, संभाजीराव बोरनारे, कामगार नेते मनोहर शिंदे, प्रभारी कार्यकारी संचालक विधीज्ञ तुळशीराम कानवडे, सीओओ शिवाकुमार, व्यवस्थापकीय व्यवस्थाक प्रकाश डुंबरे, तांत्रीक सल्लागार सीमांचल पांडा, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, संजीवनीचे ग्रुप हेड संजीव पवार, शेतकी अधिकारी एन. डी. चौधरी, संदिप गवळी, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर, मुख्य जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे, हेडटाईम किपर भास्करराव बेलोटे, यांच्यासह साखर कारखान्याच्या उत्पादन विभागातील खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार, आजी माजी पदाधिकारी, व शिंगणापुर पंचक्रोशीतील विविध संस्थांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.