
कोपरगाव :- माणसाच्या जीवनात नेहमीच सुख असेल असे नाही तर दुःखही येतं, माणूस सुखात देवाला विसरून जातो परंतु दुःखाच्या प्रसंगी देवाला शरण जावून देवाचा धावा करतो आणि मग माणसाच्या जीवनात जेव्हा दुःख येते तेव्हा देव माणसाच्या बरोबर असतो म्हणूनच
देवाकडे सुख नाही तर दुःखही मागितल्याची उदाहरणं आहेत ” असे विचार सराला बेटाचे मठाधिपती महंत श्री रामगिरीजी
महाराजांनी भक्त निवास येथील किर्तन प्रसंगी व्यक्त केले.

कोपरगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षक बॅंकेचे जेष्ठ माजी संचालक कै. सोपानराव महादु पा जाधव (मुळ राहणार शिंगवे)यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी स्थान कोपरगाव बेट भागातील भक्त निवास येथे कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक बॅंकेचे ज्ञानेश्वर सोपानराव जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

कीर्तन सोहळ्याला ह भ प नवनाथ महाराज खेगकर, ह भ प भगवान महाराज शास्त्री, ह भ प अंबादास महाराज जाधव, ह भ प नकुल महाराज जाधव यांच्यासह परिसरातील भजनी मंडळ सहभागी झाले होते.
कै. सोपानराव महादु पा जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांनी केलेल्या धार्मिक सेवेची आठवण करून देत दानधर्माची महती वर्णन केली जाधव परिवाराचे सराला बेटाशी असलेल्या चाळीस वर्षाची सेवा
कौतुकास्पद असल्याचे सांगितले
प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त जुन्या पिढीतील सेवानिवृत्त शिक्षक
शिक्षक बॅंकेचे कर्मचारी पदाधिकारी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप सोपानराव जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.