
कोपरगाव : – सन उत्सवांच्या काळात डी जे च्या कर्णकर्कश आवाजासोबत लेझर लाईटचा होणारा गैरवापर नागरिकांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदूषण व लेझरच्या वापराबाबत प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोपरगाव डॉ. अशोक गावित्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात डॉ. गावित्रे पुढे म्हणाले कि, सण, उत्सव हे आनंद सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. मात्र, उत्सवाच्या नावाखाली मोठ्या आवाजात डी जे वाजवणे नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने ध्वनी प्रदूषण करणे योग्य नाही, विशेषता लहान मुले ज्येष्ठ नागरिक रुग्ण तसेच प्राणी, पक्षांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच बी.आय.एस मानकांचे उल्लंघन करून लेझर लाईटचा वापरही अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे, नाहीतर डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण नियम) 2000 नुसार निर्धारित मार्गदर्शक अधिक आवाज करणाऱ्या आयोजकांवर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच बी .आय. एस (BIS)कायदा 2016 नुसार आवश्यक परवानगीशिवाय साऊंड आणि लेझर सिस्टीमची विक्री, जोडणी आणि उत्पादन करणाऱ्यांवर जप्तीची कार्यवाही करावी अशी विनंती कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री उद्धव डमाळे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोपरगाव कार्यकारिणी केलेली आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोपरगाव तालुका अध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे, कार्याध्यक्ष श्री शिवराज दुशिंग, उपाध्यक्ष श्री रामनाथ भुजाडे, मेजर श्री मारुती कोपरे, बुवाबाजी संघर्ष विभाग श्री राजेंद्र उगले, युवा जागृती विभाग मेजर श्री विनोद थोरात, श्री प्रवीण आभाळे, वैज्ञानिक जाणीव विभाग श्री राहुल आभाळे, व्यसनमुक्ती प्रबोधन विभाग श्री किशोर शिंदे, जिल्हा कार्यवाहक प्राध्यापक श्री दीपक शिरसाठ आदी उपस्थित होते.