Homeकोपरगावया संघाने तालुकास्तरीय विजेतेपद पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्र

या संघाने तालुकास्तरीय विजेतेपद पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्र

कोपरगाव :- तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत, आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम अँड ज्युनिअर कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले. आता हा संघ ऑक्टोबर महिन्यात संगमनेर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला. या स्पर्धेत हा संघ कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करेल.

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कुलच्या मैदानावर नुकतीच हि क्रीडास्पर्धा संपन्न झाली. त्यात तालुक्यातील तेरा शालेय संघांनी सहभाग घेतला. त्यात आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, रेन बो इंटरनॅशनल स्कूल, समता इंटरनॅशनल स्कूल, के. जे. सोमय्या साकरवाडी, बी.एम.टी विद्यालय कोपरगाव, के. बी. पी.विद्यालय कोपरगाव, संजीवनी विद्यालय संजीवनी, जी.पी.एस विद्यालय कोळपेवाडी, शारदा इंग्लिश मीडियम कोपरगाव आदिंचा समावेश होता.
गौतम पब्लिक स्कूल व समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवीला.
कोळपेवाडी स्कूलचे प्राचार्य शेख नूर सर यांनी त्यांनी नाणेफेक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अंतिम सामन्यात जीपीएस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात चार बाद 51 धावा केल्या 52 धावांच्या लक्ष आत्मा मालिक संघाने 6.1 षटकात तीन बाद 54 धावा काढून पूर्ण केले . विजेत्या संघातील खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्राचार्य नुर शेख, तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नितीन निकम, एस जी विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य मकरंद कोऱ्हाळकर , गौतम पब्लिक स्कुलचे क्रिडा प्रशिक्षक रमेश पठारे तसेच विजेत्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत शर्मा, राहुल रोकडे, दयानंद राठोड , क्रिकेट विभाग व्यवस्थापक संदीप बोळीज आदि उपस्थित होते. विजेत्या संघातील खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, प्राचार्य माणिक जाधव, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक सर व संत मंडळींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!