
मा.खा.वाकचौरे यांच्या पुढाकारातून 5000 युवकांना मिळणार नोकरीची संधी
कोपरगाव : – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार मा. भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने येत्या 9 ऑक्टोबर 2026 रोजी शिर्डी जवळील आत्मा मालिक संकुल, कोकमठाण येथे सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत भव्य आनंद नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात सुमारे 5000 युवकांना आपल्या पात्रतेप्रमाणे नोकरीची सुवर्णसंधी मिळणार असून जाग्यावर ऑफर लेटर मिळणार असल्याची माहिती खा. वाकचौरे यांनी नुकतीच जाहीर पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

खरं तर शिर्डी लोकसभा मतदार संघ शेतीच्या दृष्टीने सधन मानला जात असला तरी निसर्गाच्या लहरीनुसार अनेक सक्षम युवक बेरोजगार असल्याचे खा.वाकचौरे यांच्या वारंवार निदर्शनास आले आणि या युवकांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी ठोस पाऊल उचललेआहे.

भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली उद्याचा सक्षम युवक घडविण्यासाठी पुणे येथील युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यां कंपनीची मदत घेऊन जवळजवळ 78 पेक्षा जास्त उच्चदर्ज्याच्या कंपनी आपल्या HR टिमसह श्री साईंच्या शिर्डीत येऊन सहभागी होत आहे. अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यां जिल्ह्याच्या मधोमध असलेल्या शिर्डी लोकसभा क्षेत्रात परिसरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नामांकित कंपन्या या नोकरी मेळाव्यात सहभागी होणार आहेत. या भव्य नोकरी मेळाव्यामध्ये ऑटोमोबाईल्स, IT, बँकिंग, फायनान्स, फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, लॉजिस्टिक्स, रिटेल, सेल्स -मार्केटिंग, BPO/ITES, हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी आणि इतर विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये Tata Motors, Mahindra & Mahindra, TCS, ICICI Bank, Axis Bank, HDFC Bank, Bajaj Auto, TVS Motor, Sun Pharmaceutical Industries, Infosys, Larsen & Toubro आणि Maruti Suzuki यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या क्षेत्रांशी संबंधित रोजगाराच्या संधींचा समावेश असणार आहे. तसेच स्थानिक व प्रादेशिक पातळीवरील विविध MSME, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल अॅन्सिलरी, सर्व्हिस सेक्टर आणि इतर कंपन्यांचाही सहभाग राहणार आहे. पाचवी पास ते उच्च पदवीधरांपर्यंत प्रत्येक युवक यात सहभागी होऊ शकतो. या नोकरी मेळाव्यात अनुभवी उमेदवारांसाठी त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार विविध नोकरीच्या संधी उपलब्ध असतील. विशेष म्हणजे नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘जॉब कार्ड’ देण्यात येणार आहे. हे जॉब कार्ड सहा महिन्यांसाठी वैध राहणार असून या कालावधीत उपलब्ध होणाऱ्या योग्य नोकरीच्या संधींसाठी उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना कंपन्यांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महिलांसाठी गृहउद्योग प्रशिक्षण म्हणजे ज्या महिलांना स्वतःचा गृहउद्योग किंवा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या महिलांसाठी गृहउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती युवा हबचे श्री. दीपक पवार (Founder Director & CEO) तसेच श्री. किरण रहाणे
(Director) यांनी मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे समवेत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. कमलाकरजी कोते, शिवसेना जिल्हाप्रमुख
श्री. नितीनजी औताडे, शिवसेना नेते श्री. राजाभाऊ झावरे, युवानेते श्री. मुकुंदजी शिनगर, संपर्क प्रमुख मा. बाळासाहेबजी पवार, सोशिअल मीडिया जिल्हाप्रमुख श्री. ज्ञानेशजी कपिले यांच्यासह सचिन मलिक, रिंकेश जाधव, ओंकार गोंदकर, ज्ञानेश्वर सानप यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियातील सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी उपस्थितीबद्दल मुकुंद सिनगर यांनी सर्वं पत्रकार बांधवांचे आभार मानले आणि जास्तीत जास्त युवकांनी नुकतेच लॉन्च केलेल्या QR कोडवर नोकरी मिळण्यासाठी अधिकृत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.