Homeकोपरगावदुष्काळात साखर उद्योग जगविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रतिटन सातशे रूपये अनुदान...

दुष्काळात साखर उद्योग जगविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रतिटन सातशे रूपये अनुदान द्यावे -बिपीनदादा कोल्हे

कोपरगाव :- शासनाच्या धोरणाप्रमाणे यंदा साखर हंगाम एक महिना अगोदर सुरू होत आहे संजीवनीने त्याची तयारी केली आहे, दुष्काळाची तीव्रता मोठी आहे त्यामुळे उसाचा उतारा आणि उत्पादन घटणार आहे तेंव्हा साखर उद्योग जगविण्यासाठी केंद्राने ३५० व राज्य शासनांने ३५० रूपये असे ७०० रूपये प्रतिटन अनुदान सर्व साखर कारखान्यांना द्यावे अशी मागणी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली. खरीपात तीन महिने पावसांने ओढ दिली त्यामुळे जनावरांचे चा-याचा प्रश्न गंभीर होणार आहे तेंव्हा ज्या शेतक-यांना थोडेफार पाणी आहे त्यांनी चारा कडवळ पीक घ्यावे त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सभासद शेतक-यांना मोफत चारा बियाणे पुरविणार असल्याचेही ते म्हणांले. पुढच्या हंगामाचे नियोजन केले नाही तर राज्यातील ५० टक्के साखर कारखाने बंद पडतील या धोक्याचीही त्यांनी जाणिव करून दिली.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदन समारंभ बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे युवा अध्यक्ष आमदार विवेक भैय्या कोल्हे, संचालक ज्ञानदेवराव औताडे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. बेबीताई औताडे यांच्या हस्ते शनिवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, सर्व संचालक, सीओओ शिवाकुमार मोहनदास, तांत्रीक सल्लागार सिमांचल पांडा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी मागील व चालु हंगामाबाबत प्रास्तविक केले. ज्येष्ठ माजी उपाध्यक्ष निवृत्ती कोळपे यांच्या हस्ते संचालक ज्ञानदेव औताडे, सौ. बेबीताई औताडे यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला.

श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणुकीतून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना प्रत्येक हंगामात निर्माण होणा-या अडी अडचणींवर मात करून यशस्वी मार्गा क्रमण करत आहे. चालु हंगामात सुरूवातीला पर्जन्यमान झाले पण त्यानंतर तीन महिने पावसाने ओढ दिल्यांने खरीप हंगामासह उस शेतीचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. चालु गाळपास येणा-या उसाची परिपक्व वाढ न झाल्याने साखर उता-यात घट होणार आहे परिणामी शेतक-यांसह साखर कारखान्यांचे प्रचंड आर्थीक नुकसान होणार आहे, हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनांने कारखान्यांना ७०० रूपये प्रतिटन अनुदान देवुन हा उद्योग वाचविण्यांसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. रब्बीची परिस्थिती अवघड आहे. चालु हंगामात गाळपासाठी शेतात उभा असलेला उस पशुधनाच्या वैरणासाठी जाणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतक-यांनी आताच चारा पिकाचे नियोजन करावे तसेच पुढील हंगामासाठी शेतकी विभागाच्या प्रत्येक कर्मचा-यांने किमान पंधरा गुंठ्याचे एक हजार प्लॉट शोधुन त्यात उस लागवडीसाठी शेतक-यांना प्रोत्साहन द्यावे कारखान्यांने उपाध्यक्षांसह दहा संचालकांची समिती स्थापन करून टार्गेट ठरवुन त्याचा पंधरा दिवसाला आढावा घ्यावा म्हणजे पुढच्या हंगामात काही प्रमाणांत शाश्वत उस उपलब्ध होईल अन्यथा सर्वच परिस्थिती हाताबाहेर जाईल. अन्य कारखान्यांच्या तुलनेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना दैनंदिन गाळपात वाढ व आधूनिकीकरणांत मागे नाही तेंव्हा कर्मचारी, जबाबदार अधिक-यांनी डोळयात तेल घालुन गाळपाचे उददीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, जी कामे अपूर्ण आहे ती वेळेत पुर्ण करावी, दुष्काळाचे संकट मोठे आहे, शेतकरी उस उत्पादक सभासद व कामगारांची व्रजमुठ बांधणे गरजेचे आहे, एकमेकांच्या हातात हात घालुन काम करा त्यातुन येणा-या प्रत्येक संकटावर मात करण्याचा आपण प्रयत्न करू असेही ते शेवटी म्हणाले.

याप्रसंगी सर्वश्री. अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, संजय होन, त्रंबकराव परजणे, पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव बारहाते, निवृत्ती कोळपे, कामगार नेते मनोहर शिंदे, शरद थोरात, राजेंद्र देशमुख, कैलास माळी, अंबादास देवकर, बाळासाहेब शेटे, प्रदिप नवले, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव कदम, दगुराव चौधरी, मच्छिंद्र लोणारी, साहेबराव रोहोम, केशव भवर, अशोकराव औताडे, नारायणराव कार्ले, विजयराव दंडवते, भगवानराव टिळेकर, संपतराव हिंगे, बाळासाहेब चोळके, अनिल गाढवे, नानासाहेब नळे, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब वक्ते, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, रमेश घोडेराव, संजयराव औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, सतिष आव्हाड, संभाजीराव बोरनारे, फकिरराव बोरनारे, प्रकाश सांगळे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक, उस उत्पादक सभासद, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!