
कोपरगाव :- शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव सुनील गोसावी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ऊदागे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा विस्तार करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील पुरातन कालीन हेमाडपंथी महादेव मंदिर परिसरात साहित्य मैफलीचे आयोजन शाखेच्या अध्यक्षा सौ ऐश्वर्यलक्ष्मी संजय सातभाई यांच्या प्रेरणेने करण्यात आले होते. स्वागत व प्रास्ताविक एड. श्रद्धा जवाद यांनी करून साईंची वारी या कवितेतून शिर्डीचा महिमा वर्णन केला.

अहिल्यानगर येथील साहित्यिक रुपचंद शिदोरे यांनी संतांच्या कार्याचा गुणगौरव करणाऱ्या कविता गाऊन मैफलीची रंगत वाढवली. कवी बाळासाहेब देवकर यांनी शेतकरी आणि शेतीचे वर्णन केले तर छायाचित्रकार कवी संजय आहेर यांनी माणसाच्या ऊसवलेल्या नात्याला टाके घालून जोडणारी कविता सादर करून उपस्थितांची मने हेलावून टाकले.
साहित्य मैफल प्रसंगी अहिल्यानगर येथील साहित्यिक रुपचंद शिदोरे व विशाल जाधव यांना सन्मानपत्र व ग्रंथ देऊन सन्मानित करताना अध्यक्षा सौ ऐश्वर्यलक्ष्मी संजय सातभाई, स्वाती मुळे, एड. श्रद्धा जवाद, हेमचंद्र भवर, बाळासाहेब देवकर, संजय आहेर, प्रमोद येवले, विशाल जाधव, प्रमोद येवले, विनोद दरांगे, प्रा. गणेश फोपसे आदी साहित्यिक उपस्थित होते.
हेमचंद्र भवर यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.