Homeनाशिकयेवलाशिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल,ता.येवला, जि.नाशिक यांचेवतीने दिले जाणारे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती...

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल,ता.येवला, जि.नाशिक यांचेवतीने दिले जाणारे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार जाहिर

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल,ता.येवला, जि.नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने घेण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य कलाकृतींना दिले जाणारे पुरस्कार जाहिर झाले आहेत.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल,येथील शहादू शिवाजी वाघ,यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांनी साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतीला साहित्य कलाकृती पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून कवितासंग्रह,कथासंग्रह,गझल संग्रह,आणि कादंबरी अशा चार साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी मागविल्या होत्या.महाराष्ट्रातून जवळपास ७०प्रवेशिका आल्या होत्या.त्यातून प्रत्येक साहित्य प्रकारासाठी एका साहित्य कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. सदरचे पुरस्कार दि.०४जून २०२२ रोजी पिंपळगाव जलाल, ता.येवला,जि.नाशिक येथे होणा-या कार्यक्रमात दिले जाणार आहेत.पुरस्कारप्राप्त निकाल पुढील प्रमाणे –

१.कवितासंग्रह-मी उजेडाच्या दिशेने निघालो–कवी मा.अरुण हरिभाऊ विघ्ने,वर्धा.

२.कथासंग्रह–मातेरं–लेखक मा.डॉ.कृष्णा महादू भवारी,पुणे.

३.गझल संग्रह–तुकोबाच्या कुळाचा वंश-गझलकार मा. संतोष विठ्ठलराव कांबळे, मालेगाव,नाशिक.

४.कादंबरी-हिकमत–लेखिका मा.सुवर्णा पवार,पुणे वरीलप्रमाणे निकाल जाहिर झाले असून या साहित्य कलाकृतीचे परिक्षण अनुक्रमे कवितासंग्रहासाठी प्रा.डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर,घोडेगाव,पुणे. कथासंग्रहासाठी प्रा.साईनाथ पाचारणे,राजगुरुनगर,पुणे, गझलसंग्रहासाठी मा.संजय पठाडे पारनेर,अहमदनगर यांनी तर कादंबरी या कलाकृतीचे परिक्षण मा प्रा.दिलीप कसबे, चाकण,पुणे यांनी केले. शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पुरस्कार प्राप्त कलाकृतींच्या कवी लेखकांना रोख रक्कम,सन्मानचिन्हं,मानाचे वस्र असे पुरस्कार दिले जाणार आहे.शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांनी या निकालाचे स्वागत केले आहे आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!