
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
" वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे " या उक्तीप्रमाणे ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र अनेक उपक्रमाने साजरा केला जातो त्या निमित्ताने तालुक्यातील कुंभारी येथे श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सलग चौथ्या वर्षी राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व राघवेश्वर आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत आश्रमाच्या परिसरात विविध प्रकारचे एक वर्ष वयाचे रोपे लावून
पर्यावरण दिन साजरा करण्यात आलाआहे, त्याचप्रमाणे संजीवनी रक्तपेढी, कोपरगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर संपन्न करण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रशांत घुले बोलतांना म्हणाले कि,रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपल्या या रक्तदानातून कोणाचा तरी जीव वाचतो आणि त्याच्या कुटुंबाचा आशिर्वाद मिळतो त्याचबरोबर वृक्षारोपन हि काळाची गरज आहे,वृक्ष लावा -वृक्ष जगवा पर्यावरणाचा समतोल राखा
सदर प्रसंगी भारत सरकारचे अहमदनगर जिल्ह्याचे स्वछता दूत श्री सुशांत घोडके उपस्थित राहून त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व तसेच पर्यावरणाचे संवर्धन याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले
सदर शिबीर यशस्वीतेसाठी संजीवनी रक्तपिढीच्या निता पाटील (संचालिका),सुरय्या पठाण,रेणुका जावळे,डॉ.कविता चौधरी,उस्मान शेख,विराज गायकवाड,सनी धिवर,देविका गायकवाड,वैष्णवी सोनवणे, पंचशिला साबळे,वृशाली जाधव या टिमने व श्री साई प्रतिष्ठानचे


अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेऊन ४० रक्त बॅग संकलन केले.
सदर उपक्रम कुंभारी पंचक्रोशितील अनेक दानशुरांनी आपले रक्तदान व वृक्ष दान करून यशस्वी केला.