Homeकोपरगावसामाजिक चळवळीत प्रसार माध्यमांचे मोठे योगदान- अँड.नितीन पोळ

सामाजिक चळवळीत प्रसार माध्यमांचे मोठे योगदान- अँड.नितीन पोळ

संपादक - राजेंद्र तासकर

           सामाजिक चळवळ ही निस्वार्थ भावनेने केली तर त्याला प्रसार माध्यमे उचलून धरतात त्यामुळे सामाजिक चळवळी यशस्वी होण्यात प्रसार माध्यमांचे मोठे योगदान आहे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले.
        नांदेड जिल्ह्यातील आग्र नामांकित दैनिकाचे प्रतिनिधी यांनी नुकतीच शिर्डी येथे भेट दिली त्यावेळी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर(प्रजावाणी) मनोहर तेलंग(तरूणभारत)

पंडित वाघमारे(सामना )गोविंद टोकलवाड(गोदातीर)सुभाष पेरकेवार(प्रजावाणी)यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना अँड पोळ पुढे म्हणाले की,कोणताही पक्ष असो की संघटना यात सामाजिक काम करत असताना निस्वार्थ भावनेने केलेल्या कामास प्रसार माध्यमांनी उचलून धरल्यास त्या नेत्याला व त्यांच्या चळवळीला महत्व प्राप्त होऊन अशा सामाजिक कामाला सर्व जनते पर्यंत नेण्याचे काम प्रसार माध्यमे करत असतात मात्र हे काम करत असताना त्या कामाला प्रसार माध्यमाने उचलून धरल्यास चांगले वलय प्राप्त होऊन अशी चळवळ सर्व समावेशक होत असते,त्यामुळे

सामाजिक चळवळीच्या यशस्वी मागे प्रसार माध्यमांचे मोठे योगदान आहे प्रसार माध्यमा कडे लोक शाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे मात्र प्रसार माध्यमांनी चुकीच्या गोष्टीचे समर्थन केल्यास त्याचेदुष्परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात अशी खंत व्यक्त केली.
यावेळी शरद त्रिभुवन रवी शेलार,बाळासाहेब आव्हाड संजय आरणे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!