Homeकोपरगावउमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- नाशिक अंतर्गत जिल्हा स्तरीय बँकर्स...

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- नाशिक अंतर्गत जिल्हा स्तरीय बँकर्स कार्यशाळा संपन्न – अभियान संचालक मा.श्रीमती लीना बनसोड

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,
दि.२२ जून २०२२ रोजी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- नाशिक अंतर्गत जिल्हा स्तरीय बँकर्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली.या कार्यशाळेचे उदघाटन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक तथा अभियान संचालक मा.श्रीमती लीना बनसोड यांचे हस्ते करण्यात आले.
केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान दारिद्र्य निर्मुलन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता समूहांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचे जीवनमान उंचावणे व आर्थिक श्रोत बळकट करण्यासाठी बँकांची भूमिका कशी महत्वाची आहे याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक तथा अभियान संचालक मा.श्रीमती लीना बनसोड यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी सन २०२२१-२२ मध्ये ५२७३ समूहांना एकूण १०१.४६ कोटी एवढे कर्ज वाटप केल्या बद्दल नाशिक जिल्ह्यतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांचा सन्मान चिन्ह हेऊन गौरव करण्यात आला.
मा.प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक श्रीमती वर्षा फडोळ यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मा.श्रीमती लीना बनसोड- मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक तथा अभियान संचालक,श्रीमती वर्षा फडोळ -मा.प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक,दीपक पाटील -डेप्युटी झोनल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र,श्री बंडू कासार -जिल्हा अभियान व्यवस्थापक,संदीप गडाख -जिल्हा व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेचे बँक व्यवस्थापक व उमेद अभियानातील जिल्हा व तालुका स्तरीय अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!