Homeकोपरगावदृष्टी चांगली असेल तर सृष्टी दिसते_आप्पासाहेब दवंगे.

दृष्टी चांगली असेल तर सृष्टी दिसते_आप्पासाहेब दवंगे.

संपादक - राजेंद्र तासकर

       दृष्टी चांगली असेल तर सृष्टी दिसते त्यासाठी डोळयाचे आरोग्य महत्त्वाचे असते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी केले.
       तालुक्यातील संवत्सर येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट,नीलवसंत मेडीकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर,मणिशंकर आय हॉस्पीटल यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन करताना ते बोलत होते. 
       प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक ज्ञानेश्वर परजणे,फकिरराव बोरनारे, शिवाजीराव बारहाते,पांडुरंग शिंदे,त्रंबकराव परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नीलवसंत मेडीकल फाउंडेशन व रिसर्च सेंटरचेडॉ.नवनाथ घोलप यांनी डोळयांचे आरोग्य व आजार याबाबत माहिती दिली.डॉ. मनिषा वाघमारे डॉ.माधवी केदारे, डॉ.दिपक वाघ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
      श्री.आप्पासाहेब दवंगे पुढे म्हणाले की,संजीवनी उद्योग समुह संकटात सर्वांच्या मदतीला सर्वप्रथम पुढे असतो.अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सामाजिक सेवेचे व्रत घेवुन काम केले,त्यांचा वसा जिल्हा बँकेचे अभ्यासू नेतृत्व विवेक कोल्हे यांनी घेतला आहे,त्याच जाणिवेतुन ते अनेकवर्षापासुन मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीर घेवुन समाजाची सेवा करत आहे. अतिशय कमी वेळेत त्यांनी शहरासह मतदारसंघातील अडचणी समजुन घेवून त्यावर मार्ग काढण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठानची युवाशक्ती त्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
   याप्रसंगी सर्वश्री.बाळासाहेब शेटे,संजय भाकरे,संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र परजणे,बापूराव बारहाते.प्रविण भोसले,मुकूंद काळे,अनिल भाकरे,अभिजित आबक,योगेश परजणे,लक्ष्मण साबळे,मधुकर साबळे,विजय काळे,बापूराव परजणे,गोविंद परजणे,अशोक लोहकणे,कचेश्वर रानोडे,दिलीप कासार,प्रकाश बारहाते,चिमाजी दैने,भाऊसाहेब ढेपले,शरद शिंदे, संदीप वाळुंज,दिनेश बोरणारे आदि उपस्थित होते.सुत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी केले,शेवटी माजी संचालक राजेंद्र भाकरे यांनी आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!