
संपादक – राजेंद्र तासकर
कामिका एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पुणतांबा येथे मोठी यात्रा भरतेश्री गंगागिरीजी महाराजांच्या मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहाची घोषणा व नारळ येथे देऊन स्थळ जाहीर केले जाते,पुढच्या वर्षीचे नारळासाठी अहमदनगर, औरंगाबाद,नाशिक जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात.
चालू वर्षी कोरोना महामारीतुन सुटल्यावर कोपरगाव आगाराने गर्दीचा अंदाज विचारात घेऊन बस आगाराचे व्यवस्थापक अभिजित चौधरी यांनी ज्यादा बसचे नियोजन केले,त्यांना स्थानक प्रमुख कुटेताई,अविनाश गायकवाड व वाहतूक नियंत्रक यांचे सहकार्य लाभले तर पुणतांबा येथे पंकज निळे,दिपक पारखे,सोनु डोईझोड,शंकर धोत्रे आदिंनी सहकार्य केले.
यात्रेसाठी कोपरगाव,राहाता, वैजापूर तालुक्यातील भक्त गण पायी दिंडीने येत असतात,भक्तांच्या सुखरूप परतीच्या प्रवासाला बस आगाराचे सहकार्य मिळाल्याने भक्तांच्या मनातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.