
संपादक – राजेंद्र तासकर
राज्यात कोरोना महामारीचा प्रकोप जानेवारी २०२० पासुन सुरू झाला त्यात असंख्य निराधार,तरूण,अबाल वृध्द रूग्ण कोरोनाने आजारी पडुन उपचार घेवु लागले मात्र त्यातअसंख्य रूग्ण दगावले कोपरगांव विधानसभा मतदार संघातही मोठया प्रमाणात शेकडो रुग्ण कोरोनाने मयत झाले असुन त्यांच्या वारसांना शासनाने ५० हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, यासंदर्भात येथील रुग्णांच्या नातेवाईकांनी शासनस्तरावर आवश्यक त्या कागदपत्रासह मदतीचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत मात्र अद्यापही त्यांना सदरचे सानुग्रह अनुदान मिळालेले नाही ते तात्काळ उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आपत्तीत देशातील ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देवुन येथील प्रत्येकाच्या पोटाची काळजी घेतली.कोपरगांव विधानसभा मतदार संघातील काही कोरोनाग्ग्रस्त रूग्णांनी मिळेल तेथुन मदत गोळा करून महागडी उपचार सुविधा घेतली,औषधांचा तुटवडा असतांनाही रूग्णांना वाचविण्यांसाठी शर्थीचे प्रयत्न केले,मात्र त्यात शेकडो रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.त्यात कुटूंबाच्या आधारस्तंभ प्रमुखांची संख्या मोठी आहे परिणामी त्यांच्यावर अवलंबुन असणारे कुटुंबातील अन्य घटक उघडयावर पडले आहेत,त्यांना दैनंदिन चरितार्थ कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे तर मोल मजुरी करून पोटाचा चरितार्थ करणा-या रूग्णांची संख्याही यात मोठी आहे त्यामुळे अशा कोरोनाग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांना शासनाने मदत करावी म्हणून मागणी केली होती त्यासाठी ५० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यांचा निर्णय झाला त्याचे प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करण्यांत आले आहे अशा रूग्णांच्या नातेवाईकांना ही मदत तात्काळ द्यावी जेणेकरून त्याचा काही प्रमाणात या कुटूंबांना आधार होणार आहे असेही सौ.स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.