
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
“आझादी का अमूत मोहोस्तव अंतर्गत” उमेद-महाराष्ट राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती येवला मार्फत तालुका स्तरीय स्वयंसहाय्यता समूहांसाठी बँक कर्ज वाटप कार्यक्रम 10 ऑगस्ट 2022 रोजी पार पडला.
यावेळी मा.गटविकास अधिकारी श्री.अन्सार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील

17 बचत गटांना 41 लक्ष कर्ज वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे 26 महिलांना CMEGP कार्यक्रम अंतर्गत 26 लक्ष रुपये समूहातील महिलांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यांच्यावतीने कर्ज मंजूर करण्यात आले.
यावेळी बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र,स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा येवला यांनी सहकार्य केले त्याचबरोबर स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या कॉप शॉपचे उद्घाटन गट विकास अधिकारी श्री.अन्सार शेख व नायब तहसीलदार श्री. चांदवडकर साहेब यांनी केले तसेच हर घर तिरंगा मोहिमेबाबत उपस्थित महिला स्वयंसहायता समूहांना माहिती देण्यात आली
यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक दीपिका जैन, तालुका व्यवस्थापक राहुल अडागळे,प्रभाग समन्वयक शुभम पवार व संतोष भटकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.