
संपादक -राजेंद्र तासकर
संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे युवा सेवक व श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे माजी विदयार्थी श्री.रोहीत कणगरे यांनी त्यांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं विदयालयातील होतकरु विदयार्थीना दप्तर वाटले.या शाळेने माझ्यावर घडवलेल्या संस्कारामुळे मला हे समाज उपयोगी काम सुचले.पुढील वाटचालीत देखिल मी शाळेला योग्य ती मदत करणार आहे.असे त्यांनी स्पष्ट केले.कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्री.सचिन अजमेरे यांनी विदयालयाच्या वतीने रोहीत कणगरे यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार केला.या प्रसंगी विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी रोहीत कणगरे यांना शुभेच्छा देवुन विदयालयांत दप्तर वाटप केल्याबद्दल आभार मानले. उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. गायकवाड,पर्यवेक्षक श्रीमती यु.एस.रायते,जेष्ठ शिक्षक रामदास गायकवाड,सिध्दार्थ साठे,रोहित गंगावणे,गौरव आढाव,कार्तिक नाईक,अजय शार्दुल,अक्षय लोहाडे,ऋषिकेश जाधव,भैय्या नागरे,सतीश बोरसे,विशाल चोरगे,ऋषी निकम,केतन पटणी आकाश कानडे,राजू खैरनार,योगेश वाघ आदी कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.