
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव येथील कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात शनिवारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंचच्या अध्यक्ष सुधाताई ठोळे होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.स्वागत व परीचय उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.या प्रसंगी जेष्ठ नागरीक मंचचे सदस्य डाॕ.विलास आचारी व श्रीमती रजनी गुजराथी यांनी विदयार्थीना मार्गदर्शन केले.संस्थेचे विश्वस्त तथा अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती कैलास ठोळे यांनी आपल्या भाषणात विदयालयाचे विदयार्थी विविध क्षेत्रात आपले कार्य यशस्वीरीत्या करीत असुन शहराच्या नगराध्यक्ष पासुन विदयापीठाच्या कुलगुरु पर्यत विदयार्थी या विदयालयांत घडले असल्याचे स्पष्ट केले.सचिव दिलीप अजमेरे यांनी आपले विचार व्यक्त करतांना जेष्ठ नागरीक मंचाने विदयालयाला दीलेल्या योगदान बद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेकभैय्या कोल्हे यांनी जेष्ठ नागरीक मंच यांनी या वयात सुध्दा केलेल्या समाज कार्याचे कौतुक केले तसेच श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाने शहराच्या योगदानात केलेले काम खुप मोठे आहे.संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम अविरत सुरुच आहे या बददल विदयालयाचे कौतुक केले.
या प्रसंगी संस्थेचे सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे,उदयोगपती श्री.संजय भनसाळी,विदयालयाच्या पर्यवेक्षिका यु.एस.रायतेताई,जेष्ठ नागरीक मंचचे श्री.दत्तात्रय कंगले,विजय बंब,योगतज्ज्ञ उत्तमभाई शहा,सुनील कंगले, राजाभाऊ शिंगी,अनिल कंगले, श्रीमती रजनी गुजराथी,डॉ. विलास आचारी,जगन्नाथ थोरे, श्रीमती रोहोम,दिलीप तुपसैंदर यांच्यासह श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात आभार सौ.एस.ए.अजमेरे यांनी तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे यांनी केले.