
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जे माजी विद्यार्थी होते ते आज यशस्वी उद्योजक,व्यवसायिक झाले आहेत त्यांच्या सन्मानार्थ सोहळा संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी कापसे पैठणीचे दिलीप खोकले हे होते.प्रमुख उपस्थितीत सुमीत भैय्या कोल्हे हे होते.शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभिजित भवर यांनी छायाचित्रण कला आत्मसात करून व्यवसायात पदार्पण केले होते.आज प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमुळे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला नाही.तरीही अडचणींना तोंड देत अभिजित यांनी प्रगतीचा मार्ग धरून,बदल स्वीकारून आपला व्यवसाय ऊर्जीतावसथेत ठेवला आहे.
हा व्यवसाय जनसंपर्क, जनमानसात संपर्क साधत करावयाचा असल्याने कोपरगाव, नाशिक भागातील जनसंपर्क चांगला आहे.मनमोकळे पणाने, मधुर बोलताना लोकांना आपलेसे केले आहे.कोपरगाव व नाशिक परिसरात चंद्रमा नाव उज्ज्वल केले आहे.आज धकाधकीच्या काळात,व्यावसायीक स्पर्धा असताना आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे म्हणून याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला आहे.
याप्रसंगी प्राचार्य दहिकर व आदि मान्यवर उपस्थित होते. अभिजित भवर यांचे वतीने उद्योजक कुणाल पाटील भवर यांनी पुरस्कार स्वीकारला.