Homeकोपरगावमाजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला जोड देत शेतक-याला सर्वाधिक उत्पादन कसे...

माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला जोड देत शेतक-याला सर्वाधिक उत्पादन कसे मिळेल यासाठी असंख्य प्रकल्प बेधडकपणे राबविले -अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे

कोपरगांव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या वार्षीक सर्वसाधारण सभेस सभासदांना मार्गदर्शन करतांना अध्यक्ष,युवानेते विवेकभैय्या कोल्हे समवेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, सर्व संचालक,कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार आदी उपस्थित होते.

संपादक – राजेंद्र तासकर

    सहकारमहर्षी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी भविष्यातील संकट समजून घेऊन संघर्ष,संकटे, आव्हाने समर्थपणे पेलुन सहकारी साखर कारखानदारी टिकवून ठेवली इतर कारखान्यांच्या तुलनेतसंजीवनीने आजपर्यंत उसाला कधीही कमी भाव दिलेला नाही,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत ऊस भावात मागे राहणार नाही असे प्रतिपादन अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.केंद्र शासनाने एफआरपीची रक्कम ज्याप्रमाणे वाढविली त्याप्रमाणात साखर विक्रीच्या दरातही वाढ करावी तरच सहकार टिकेल,  असेही ते म्हणाले.मागील हंगामात उच्चंiकी गाळप केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता सहा हजार मे टन करून आगामी सर्व स्पर्धेला संजीवनीला सज्ज करण्यात येत आहे असेही ते म्हणाले.
        सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची साठावी वार्षीक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर सोमवारी पार पडली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. 
     प्रारंभी अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद शेतक-यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली.माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या विकासात्मक कार्याचा सखोल आढावा शिवाजीराव वक्ते यांनी घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 
       शरद पोपटराव शिंदे आडसाली (शहा सिन्नर),बाळासाहेब माधवराव संधान पूर्व हंगामी (दहिवडी सिन्नर), पुंडलिक आनंदा गिते सुरू (संवत्सर), व एकनाथ कचरू गवांदे खोडवा (लक्ष्मणपुर सिन्नर),या सर्वाधिक उस उत्पादन घेणा-या शेतक-यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.उपाध्यक्ष रमेश घोडेराव सर्व संचालक व कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार यांनी सभासदांचे स्वागत केले.याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे,संचालक सर्वश्री.ज्ञानेश्वर परजणे,विश्वासराव महाले,बापुसाहेब बारहाते,निलेश देवकर,बाळासाहेब वक्ते,रमेश आभाळे,ज्ञानदेव औताडे,आप्पासाहेब दवंगे,राजेंद्र कोळपे,ज्ञानेश्वर होन,मनेष गाडे, विलास वाबळे,विलास माळी, निवृत्ती बनकर,सतीश आव्हाड, त्र्यंबकराव सरोदे,सौ.उषा संजय औताडे,सौ.सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे,अरुणराव येवले,साहेबराव कदम,केशव भवर,कैलास माळी, यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले.मागील सभेचे इतिवृत सचिव तुळशीराम कानवडे यांनी वाचले त्यास सभासदांनी मंजुरी दिली.
   श्री.विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी शेती आणि शेतकरी डोळयासमोर ठेवुन त्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांची विचारधारा आपण पुढे अशीच चालवुन उत्कर्ष साधु. आज सहकारासमोर खाजगीचे आव्हान आहे,अतिरिक्त साखर उत्पादन,उसतोडणी कामगारांची कमतरता यासह असंख्य नव नविन प्रश्न साखर कारखानदारीसमोर निर्माण झाले आहेत त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेवुन उस तोडणी यंत्र खरेदीस तसेच औषधी व प्रायोगीक प्रकल्प,संशोधन व विकासासाठी अनुदान द्यावे.भविष्यात उस वाहतुक करणा-या वाहनांचा खर्च कमी करण्यासाठी कारखाना बायो सी एन जी साठी प्रयत्नशिल आहे.घरगुती व उद्योगासाठीच्या साखरेचे दर वेगवेगळे ठरवावेत.साखर कारखानदारीकडे हंगामी उद्योग म्हणून पाहिले जाते मात्र त्याकडे वार्षीक उद्योग कसा होईल यासाठी सर्वाना प्रयत्न करावे लागेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सकारात्मक धोरणामुळे मागील हंगामात भारत सर्वाधिक उत्पादन व निर्यात करणारा देश ठरला आहे.त्याबद्दल तसेच आयकराची रक्कम माफ केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.चालुवर्षीही देशात ३५५ लाख मेटन विक्रमी साखरेचे उत्पादन होणार असल्याने साखर निर्यातीबाबतचे धोरण आजच जाहिर करून साखर कारखानदारीला दिलासा द्यावा. 
    माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला जोड देत शेतक-याला सर्वाधिक उत्पादन कसे मिळेल यासाठी असंख्य प्रकल्प बेधडकपणे राबविले.त्यांचे हेच धोरण आम्ही सर्व संचालक मंडळाने कायम ठेवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना उसावरील कीड त्यावरील उपाययोजना,उसाची परिपक्वता वाढ व टनेज,आदि माहिती अत्याधुनिक सॅटेलाईट तंत्रज्ञानातुन ई कृषि ॲपच्या माध्यमांतुन सभासद शेतक-यांना उपलब्ध करून देवुन देशातील पहिल्या दहा सहकारी साखर कारखानदारीत कोल्हे कारखाना स्थान मिळविल अशी ग्वाही त्यांनी दिली. कोपरगांव तालुक्यात ड वर्ग घरकुल लाभापासून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा समावेश पुन्हा पात्र यादीत करून दिल्याबददल कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला.सुत्रसंचलन व आभार संचालक विश्वासराव महाले यांनी केले. 

चौकट
माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे सहकारी साखर कारखानदारीतील योगदान लक्षात घेवुन त्यांचा पुर्णाकृती पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात यावा अशी सुचना ऐनवेळच्या विषयात आप्पासाहेब औताडे व रमेश औताडे यांनी केली त्यास सर्व सभासदांनी हात उंचावुन संमती दिली.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!