





संपादक – राजेंद्र तासकर
एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील कारवाडी मंजूर शाळेतील सलग दुसऱ्या वर्षी पाच विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे.१८ पैकी १५ मुले उत्तीर्ण झाले आहेत.शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कु.महिमा नवनाथ मोरे,कु. दिव्या साईनाथ माळी,कु.आरती भाऊसाहेब भगरे,चि.पराग सुभाष पायमोडे,चि.प्रसाद किशोर मोरे या पाच विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुभाष पायमोडे,वर्गशिक्षक किरण निंबाळकर,सिताकांत खांडगौरे, नामदेव सोनवणे,बबन काळे,रजिया शेख,आशा पठाण,नारायण कवडे, गोरख बढे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने बारा हजार रुपये प्रति वर्ष इ.९ वी ते १२ वी पर्यंत असे एकूण ४८ हजार रुपये मिळणार आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे,भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे,सरपंच रूपाली माळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेवराव खुळे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख विलास भांड तसेच कारवाडी ग्रामस्थ,शिक्षकवृंद आदींनी कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.