

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील श्री दत्त महाराज मंदिर येथे आज श्री दत्त जयंतीनिमित्त मा.आमदार श्री आशुतोषदादा काळे यांनी श्री दत्त महारांजांचे दर्शन घेतले व तालुक्यातील जनतेस सुख -शांती लाभो दे ! अशी प्रार्थना केली.
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्त महाराज जयंतीनिमित्त माहेगाव देशमुख येथे पहाटे चार वाजेपासून बाम्हण देवतेच्या मंत्रोच्चाराने महाअभिषेक व विधिवत पुजेसह होमहवन,जप,अनुष्ठान अशा विविध धार्मिक कार्यक्रमासह भाविक - भक्तांनी सुस्त्राव्य किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी अभिषेकदादा काळे, परमपूज्य श्री हाके महाराज,माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे,संजय काळे, बापूसाहेब जाधव,उपसरपंच विकास रणशिंग,रविंद्र काळे,उल्हास काळे, सुरेश काळे,बाळासाहेब पानगव्हाणे, संतोष लांडगे,प्रकाश काळे,चंद्रकांत कापसे,नंदकिशोर कापसे,दत्तात्रय काळे,जीवन ढेकणे,मधुकर काळे, अण्णासाहेब काळे,रावसाहेब काळे, दत्तात्रय लांडगे,रणशिंग सर,इंद्रभान पानगव्हाणे,सखाराम लांडगे, भागीनाथ काळे,विलास काळे आदींसह भाविक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

