

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यातील संवत्सर गावातील उच्चशिक्षित तरुणांनी उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत विशाल विलासराव भाकरे व सचिन शांताराम गायकवाड यांनी स्वतःच्या हिंमतीने जुन्या नागपूर-मुबंई हायवे लगत संवत्सर हद्दीत वक्रतुंड पिव्हर-व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू करुन नव तरुणांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
ग्रामीण भागातील संवत्सर येथील विशाल भाकरे व सचिन गायकवाड यांनी उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा हॉटेल व्यवसाय जुन्या नागपूर -मुंबई हायवे लगत सुरु केला व त्याचे आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजपा कोपरगाव दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकुंदमामा काळे,संवत्सर ग्रामपंचायत माजी सरपंच वाल्मिक निकम,कोपरगाव भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष व संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे व तुषार बारहाते यांनी या तरुणाचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संवत्सर गावाची शान व वैभवात भर घालणारे हॉटेल वक्रतुंड फॅमिली रेस्टॉरंट मुबंई -नागपूर रोडलगत आजपासून खवय्यांच्या सेवेत रुजू होत असल्याची माहिती विशाल भाकरे व सचिन गायकवाड यांनी दिली हा हॉटेलचा परिसर अतिशय निसर्गरम्य व नयन रम्य आहे, या रेस्टॉरंटमध्ये पिव्हर व्हेज पद्धतीचे जेवण मिळणार येथे आल्यानंतर खवय्यांना नक्कीच समाधान मिळेल असा विश्वास यांनी व्यक्त केला. या नवतरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी बंडु कटारे,कांचन आबक, चि.आशिश बोरनरे,विलासराव भाकरे,संजय भाकरे,वैभव भाकरे, शांताराम गायकवाड तसेच संवत्सर गावातील मित्र परिवार,संपूर्ण भाकरे व गायकवाड कुटुंब व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.