

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
*युवा* हा शब्द उलटा केला तर त्याचा उच्चार *वायू* असा होतोआणि वायू म्हणजे वारा वाऱ्याला योग्य दिशा मिळाली तर चांगले असते मात्र हा वारा भरकटला तर वादळे उठतात आणि वादळे ही सर्व काही उध्वस्त करतात.
पूर्वीच्या काळी कोणतीही मनोरंजनाची साधने नव्हती त्या वेळी गावोगावी तरुण आपला युवा जोश व्यायाम शाळेत जाऊन घाम जिरवत व त्यातून आपले मन मेंदू मनगट मजबूत करत.
आजकाल राजकीय नेते युवकांची माथी भडकावून आपले राजकारण सुरळीत करत असतात यापूर्वी कोपरगाव तालुका देखील या माथी भडकवण्याच्या कामात सर्वात अग्रेसर होता मात्र याला छेद देण्याचे काम कोपरगाव तालुक्याचे युवा आमदार मा.आशुतोष काळे यांनी केले असून मतदार संघातील अनेक गावांत युवकांना शिस्त लावण्यासाठी जिम चे साहित्य उपलब्ध करून दिले, तरुणांना आजकाल मोबाईलच्या अँप व सिक्स पॅकने आकर्षित केले असून या तरुणांचा कल ओळखून युवा नेते आशुतोष काळे यांनी गावोगावी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिमचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

आजचा तरूण व्यसनाकडे आकर्षित होऊन पिढी बरबाद होत असतानाच आज याच जिम च्या माध्यमातून गावोगावचे तरुण आपले आरोग्य सदृढ बनवण्यात व्यस्त होताना दिसत असून उद्याचे हे सुदृढ तरुण देशाचे भावी नागरिक म्हणून सक्षम बनतील यात शंका नाही.
सद्या माझे मूळ गाव नाटेगाव हे असून या जिम ची माहिती मिळाल्याने जिम ला भेट देण्याचा व व्यायाम करण्याचा मोह मला आवरला नाही. खूप छान उपक्रमाचे खूप खूप स्वागत व गाव खेड्यात हा उपक्रम राबविल्या बद्दल आमदार आशुतोष काळे यांचे अॅड. नितिन पोळ माझ्या वतीने व तरुण पिढी कडून खूप खूप आभार