
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
स्त्री शिक्षणासाठी स्वतःचं आयुष्य झिजवणाऱ्या तसेच विद्येची आराध्य देवता असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी शहा गावच्या माजी सरपंच सौ.शुभांगीताई जाधव,एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यमान प्रिन्सिपल आदरणीय निळकंठ सर,शेख मॅडम व सर्व सहकारी शिक्षक आदी उपस्थित होते.
मा.सौ.शुभांगीताई जाधव,प्रिन्सिपल निळकंठ सर व सहकारी शिक्षिका शेख मॅडम यांच्या हस्ते विद्येची आराध्य देवता असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनी कु.सानिका सरवार व साईशा कासार यांनी केली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला अनुसरून स्कूलच्या विद्यार्थिनी कु.काव्या सानप,कु.समिक्षा वाणी,कु.नेहल साबळे,कु.साक्षी कुलकर्णी,कु.श्रध्दा हांडोरे, कु.राधिका तिरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच कु.समिक्षा थोरात हिने सावित्रीबाई फुले यांची भूमिका निभावत आजच्या आधुनिक काळातील सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केले.तसेच सहकारी शिक्षक ठाकरे सर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात भाषण करतांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा संघर्ष व त्यांच्या जीवनातील आदर्श विचारांची ओळख करून दिली.
अध्यक्षीय भाषण करताना प्रिन्सिपल निळकंठ सरांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेले प्रसंग सांगत स्त्री शिक्षणाचा पाया कशा पद्धतीने रचला गेला याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
शेवटी सानिका सरवार व साईशा कासार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.