Homeकोपरगावमुलींनी राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवून शिक्षण घ्यावे - सौ.अनुराधा रणदिवे

मुलींनी राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवून शिक्षण घ्यावे – सौ.अनुराधा रणदिवे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

शिक्षण घेणाऱ्या मुलींनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श ठेवून शिक्षण घ्यावे,कधीही कोणत्याही परिस्थितीत संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज असावं,स्त्री मुळात खंबीर वृत्तीची आहे, प्रत्येक कुटुंबाचा कणा स्त्री आहे तीच कुटुंब सावरत असते,मुलींनी भावनेच्या आहारी न जाता कुटुंबाचा आधार होऊन रहावं,असे विचार श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या व्यवस्थापिका सौ.अनुराधा रणदिवे यांनी व्यक्त केले.

शब्द गंध साहित्य परिषद,कोपरगाव शाखा व स्व.र.म.परीख हिंदी ग्रंथालय वाचनालय यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल योगेश कोळगे यांनी केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून मनोगत व्यक्त केले.
या वेळी कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या ऊपशिक्षीका कावेरी वलटे,साहित्यिक हेमचंद्र भवर, कवि प्रमोद येवले,माजी सैनिक मधु साबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद येवले यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी विचार व्यक्त करुन आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!