Homeकोपरगावसुरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण संपन्न

सुरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

   कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सुरेगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी महोत्सव व जगद्गुरु तुकाराम महाराज बीजोत्सव तसेच एकनाथ महाराज जलसमाधी सोहळ्यानिमित्त सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे ध्वजारोहण सिद्धेश्वर देवस्थानचे मंहत गोवर्धनगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. 
        गोदावरीच्या तीरावर वसलेले सुरेगाव ऐतिहासिक व पौराणिकवारसा असलेल्या हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी ह भ प काशिनाथ महाराज मोरे,दिलीप महाराज डहाळे विनायक महाराज वाघ,तसेच सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,ज्येष्ठ नेते मोहनराव वाबळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब,शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक सुदाम वाबळे,सुरेगाव सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत वाबळे,उपाध्यक्ष शंकर कदम,ज्येष्ठ नेते पांडुरंग वाबळे,शिवाजी यशवंत वाबळे,उद्योजक समीर कुलकर्णी पोलीस पाटिल संजय वाबळे,रवींद्र देवकर, सामाजिक कार्यकर्ते भागवत कदम,कैलास बोरनर,श्रीधर कदम, दशरथ कदम,शिवभक्त दीपक निंबाळकर,गोपीनाथ सोनवणे, सोपान सोनवणे,विष्णू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी भागवताचार्य कावेरीताई घुमरे ह.भ.प.निवृत्ती महाराज चव्हाण(ठाणगावकर)ह.भ.प.रेखाताई काकड(निराळे)ह भ प अंबादास महाराज गोरे (रुई)ह भ प ज्ञानेश्वर माऊली गायकवाड(धुळगाव)ह भ प डॉ.जलाल महाराज सय्यद (करंजीकर)यांनी कीर्तन करून समाज प्रबोधन केले तसेच हभप उषाताई बाळासाहेब देशमुख (धामोरीकर)व सिंधुताई बोरनर(सुरेगाव)ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ उपक्रम सुरू आहे अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगता व काल्याचे किर्तन दि.१३मार्च २०२३रोजी स.१० वा.ह भ प दत्ता महाराज देवळीकर (चाळीसगाव)यांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.
    याप्रसंगी सुरेगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळ गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या अथक परिश्रमातून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडत आहे तसेच कु्षी मित्र, कैलास कदम,सचिन वाबळे,शिवभक्त शंकर वाबळे,गोकुळ गिरी,सचिन दवंगे,संजय निंबाळकर,दिंगबर कदम,किरण देशमुख उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!