
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने दिव्यांग बांधवांना रेल्वे पास काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,ज्या दिव्यांग बांधवांनी रेल्वे पाससाठी नाव नोंदणी केली होती अशा ७५ दिव्यांग बांधवांचे रेल्वे पास उपलब्ध करून दि.९ मार्च२०२३ रोजी मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि दि.२४ मे२०२२ रोजी झालेल्या मनसे नेते श्री.अमितभैय्या राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने ७५ दिव्यांगांना रेल्वे पासचे वाटप लायन्स मूकबधिर विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ते श्री नारायण डुकरे सर यांच्या उपस्थितीत व कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे अष्टपैलू पी आय मा.श्री.वासुदेवजी देसले साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर रेल्वे पास वाटपास मनसे उपजिल्हाध्यक्ष संतोषभाऊ गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिलभाऊ गायकवाड, तालुका मार्गदर्शक सुनीलभाऊ फंड,यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पारखे,तालुका संघटक संजय गीते यांच्या प्रयत्नातून तसेच कोपरगाव रेल्वे स्टेशनचे मुख्य तिकिट बुकिंग अधिकारी श्री.शंतनू मेहरे साहेब व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीयअधिकारी डॉ.श्री.सचिन यादव साहेब यांच्या अनमोल सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी बोलताना मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देऊन दिव्यांग बांधवांना रेल्वे पास विषयी माहिती दिली तसेच आज जो रेल्वे पास वाटपाचा कार्यक्रम होत आहे याचे पूर्ण श्रेय आमचे दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांना जाते त्यांच्यामुळे आम्हाला आज दिव्यांग बांधवांच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन संवाद साधता आला असे गौरवोद्गार मनसे उप जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ गंगवाल यांनी काढले.
अध्यक्ष स्थानावरून दिव्यांगांना अनमोल मार्गदर्शन करतांना कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पी आय श्री. वासुदेवजी देसले साहेब म्हणाले कि,कोपरगाव मनसे दिव्यांगांच्या वतीने दिव्यांगांसाठी राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे,इतरांनाही अशा प्रकारच्या उपक्रम राबविण्यास प्रेरणा देणारा उपक्रम आहे.दिव्यांगांनी रेल्वे पासचा कशा प्रकारे वापर करावा,रेल्वे प्रवास करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी तसेच दिव्यांग बांधव हे दिव्यांग नसून त्यांना मी माझे गुरु मानतो दिव्यांग बांधवांनी स्वतःला अजिबात कमी लेखू नये दिव्यांग बांधवांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल म्हणाले कि,७५दिव्यांग बांधवांना रेल्वे पास वाटप करताना आज मला खूप आनंद होत आहे,त्याहीपेक्षा दिव्यांगांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले यापेक्षा मोठा आनंद माझ्या जीवनात असू शकत नाही,तसेच उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनसे दिव्यांग सेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन दिव्यांग बांधवांच्या कार्यक्रमास हजर राहून मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.तसेच दिव्यांग पास काढण्यासाठी माझे मित्र विजुभाऊ कासलीवाल,अनंत दादा रूकारे,नरेंद्रजी दगडे,राजेंद्र सुपेकर यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार मानण्यात आले.
याप्रसंगी कोपरगाव तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच दिव्यांग बांधवांना मनसे दिव्यांग सेनेच्या वतीने रेल्वे पास उपलब्ध करून देण्यात आले त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांनी मनसे दिव्यांग सेनेचे आभार मानले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पारखे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.