Homeकोपरगावकोपरगाव नगरपालिका नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी, कानउघडणीसाठी धडकला RPiचा जन आक्रोश...

कोपरगाव नगरपालिका नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी, कानउघडणीसाठी धडकला RPiचा जन आक्रोश मोर्चा

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव नगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याने,सामान्य नागरिकांच्या असलेल्या विविध समस्यांबाबत नगरपालिकेची कानउघडणीसाठी व त्याचा जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने आक्रमक भूमिका घेतली व त्यांनी रस्त्यावर उतरून भव्य स्वरूपाचा जनआक्रोश मोर्चा २७ मार्च २०२३ रोजी नगरपालिकेवर धडकविला.सदर मोर्चा मध्ये शेकडो नागरिक, महिला युवक सहभागी झाले होते.
 या जन आक्रोश मोर्चास शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहास अर्पण करून अभिवादन करण्यात आले व मोठया प्रमाणात घोषणाबाजी करत स्मारकापासून सुरवात करण्यात आली दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधनाच्या मार्गाने थेट नगरपालिकेत मोर्चा नेण्यात आला.
   नगरपालिका मुख्याधिकारी श्री.गोसावी साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,शहरातील नागरिकांना दररोज पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे,आरोग्याच्या चांगल्या सेवा सुविधा मिळाव्या,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकाचे शासकीय लोकार्पण व्हावे,खुले नाट्यगृहाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच शहरातील विविध प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून सदर मागण्या येत्या १४ एप्रिलपर्यंत पूर्ण न झाल्यास आम्ही कोपरगाव बंदची हाक देऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण करू असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.
                  यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,

जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, युवक जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, राज्यउपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, राज्य सचिव दिपक गायकवाड, महिला जिल्हा उपाध्यक्षा वैशाली सोणवने, महिला तालुकाध्यक्षा अलकाताई देवगावकर,तालुकासल्लागार सोमनाथ लोहकरे,तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे, शहराध्यक्ष रामदास कोपरे,उपाध्यक्ष फकिरा चंदनशिव,उप शहरप्रमुख अनिस शेख,सुनिल खरात,अमोल थोरात,अविनाश मोरे,राहुल सोणवने, आकाश डोखे,प्रशांत मेहरखांब,संदीप दुशिंग आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला,युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!