
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलदुत राजेशजी मंटाला यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे नगर पालिकेच्या पाच नंबर तळ्यांचा प्रश्न मार्गी लागला असून
कोपरगावच्या नागरिकांची तहान लवकरच भागेल असा आशावाद निर्माण झाला असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

कोपरगाव तालुक्याच्या प्रस्तापित नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे गेली अनेक वर्षे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला होता त्यासाठी कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला हे कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी जलदुत म्हणून धावून आले त्यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी कंबर कसली आणि थेट दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला नुसता संपर्क करून थांबले नाही तर त्यासाठी कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक यांना सोबत घेऊन “डिजिटल पाणी आंदोलन” उभे केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व त्यांच्या कल्पनेतून एकाच वेळी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालय,मुख्यमंत्री कार्यालय,जल जीवन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तहसीलदार, मुख्याधिकारी यांना एकाच वेळी इमेल पाठवण्यात आले कोपरगाव शहरातील हजारो नागरिकांनी या डिजिटल पाणी आंदोलनात सहभागी होऊन इमेल केले,एकाच प्रश्नावर हजारो इमेल प्राप्त झाल्याने शासकीय यंत्रणा जागी झाली वेळोवेळी स्वतः पदरमोड करून अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्याकोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाचे

गांभीर्य समजावून सांगितले आणि या प्रश्नाला गती मिळून कोपरगाव नगरपालिकेच्या पाच नंबर तळ्यासाठी 131 कोटींचा निधी प्राप्त झाला.या पाणीआंदोलनात कोपरगाव शहरातील एक सामान्य नागरिक म्हणून वेळोवेळी सहभाग नोंदवा या लढ्याचा साक्षीदार म्हणून पाणी योजनेला निधी प्राप्त झाला त्यावेळी राजेशजी मंटाला यांच्या सोबत जलोष केला त्या वेळी योजना मंजूर झाल्याने व त्यांच्या पाणी आंदोलनाला यश मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात नकळत तराळलेले पाणी अनुभवले सद्या या कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आज प्रत्यक्ष कामावर भेट दिली या पाणी आंदोलनाचा एक साक्षीदार म्हणून व एक आंदोलक म्हणून दिलेल्या लढ्याला आलेले यश पाहून “जलदुताच्या अथक प्रयत्नामुळे पाणी लढा यशस्वी” होत असल्याचे पाहून मनस्वी आनंद झाला.लवकरच कोपरगाव शहराच्या जनतेला स्वच्छ व नियमीत पाणी मिळेल हा आशावाद निर्माण झाला.