

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त"आनंदाचा शिधा" वाटपाचा कार्यक्रम जाहिर करताच कुंभारी येथील स्वस्त धान्य दुकानात ओंकार महिला बचत गटाअंतर्गत शासनाकडुनआलेल्या "आनंदाचा शिधा"चे वाटप आज दि.११एप्रिलपासून मोठया आनंदात सुरू करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील ४३ हजार ५५६ शिधापत्रिकाधारकांना हा "आनंदाचा शिधा" वाटप करण्यात येणार आहे,यामध्ये दारिद्रय रेषेवरील आणि केशरी शिधापत्रिका धारकांना एक किलो रवा,एक किलो चना डाळ,एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल पिशवी अशा चार वस्तुचा किट अवघ्या १०० रुपयात कुंभारी येथे वाटप सुरू झाले,हा"आनंदाचा शिधा "याचे वाटपाचे उद्घाटन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी.संचालक शिवाजी आबाजी कदम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देऊन करण्यात आले,त्यावेळी लाभ घेतलेल्या लाभार्थ्याच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाल्याचे पहावयास मिळाले.
यावेळी माजी.संचालक शिवाजी आबाजी कदम, बाबासाहेब चिने,संजय भागवत बढे,पत्रकार संजय भारती, भाऊसाहेब सुडके,राहुल कबाडी,शंकर चंदनशिव,चंद्रकलाबाई मुळे,सुनिता दत्तु पवार,बचत गटाच्या अध्यक्षा सौ.योगिताताई निळकंठ,सौ.शशिकलाताई व्हरे यांसह आदि लाभधारक उपस्थित होते.
शेवटी ओंकार महिला बचत गटाच्या वतीने सर्व लाभधारकांना आवाहन करण्यात आले कि,सर्व लाभधारकांनी १४ एप्रिलपर्यंत"आनंदाचा शिधा "चा लाभ घ्यावा,लाभापासून कोणीही वंचित राहु नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
