Homeकोपरगावजैन मुनिश्रींचे विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडून श्रद्धापूर्वक स्वागत

जैन मुनिश्रींचे विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडून श्रद्धापूर्वक स्वागत

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

           प.पू.१०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परम प्रभावक शिष्य प.पू.१०८मुनिश्री अक्षयसागरजी महाराज,प.पू.१०८ मुनिश्री नेमीसागरजी महाराज,प.पू.१०८ मुनिश्री शैलसागरजी महाराज,प.पू.१०८मुनिश्री अचलसागरजी महाराज,प.पू.१०५मुनिश्री ऐलक उपशमसागरजी महाराज यांचे ग्रीष्मकालीन वाचनेसाठी कोपरगाव शहरात आगमन झाले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्व मुनिश्रींचे श्रद्धापूर्वक स्वागत केले व त्यांचे आशीर्वाद घेतले.तसेच सर्व मुनिश्रींसोबत ते मशाल चौक,येवला नाका ते कोपरगाव शहरातील कापड बाजार भागातील जैन मंदिरा पर्यंत पायी चालत गेले.ग्रीष्मकालीन वाचनेसाठी प.पू.१०८ मुनिश्री अक्षयसागरजी महाराज,प.पू.१०८मुनिश्री नेमीसागरजी महाराज, प.पू.१०८मुनिश्री शैलसागरजी महाराज,प.पू.१०८मुनिश्री अचलसागरजी महाराज,प.पू.१०५मुनिश्री ऐलक उपशमसागरजी महाराज यांचे धुळे येथून बुधवारी (१९ एप्रिल) सायंकाळी कोपरगाव येथील मशाल चौक,येवला नाका येथे आगमन झाले.यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने सर्व मुनिश्रींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्व मुनिश्रींचे स्वागत केले.नंतर या सर्व मुनिश्रींची ढोल-ताशांच्या गजरात शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली.विवेकभैय्या कोल्हे हे स्वत:या मिरवणुकीत सर्व मुनिश्रींसमवेत पायी चालत कापड बाजार भागातील जैन मंदिरापर्यंत गेले. 
        ही मिरवणूक कापड बाजार भागातील जैन मंदिरात पोहोचल्यानंतर तेथे विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्व मुनिश्रींचे श्रद्धापूर्वक स्वागत करून आशीर्वाद घेतले.याप्रसंगी विवेकभैय्या कोल्हे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.पाच वर्षांपूर्वी प.पू.१०८ मुनिश्री अक्षयसागरजी महाराज कोपरगाव येथे आले होते त्यावेळी तत्कालीन आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे भक्तिभावाने स्वागत केले होते.आता पाच वर्षांनंतर प. पू.१०८मुनिश्री अक्षयसागरजी महाराज यांचे ससंघ कोपरगाव शहरात आगमन झाले आहे.त्यांचे स्वागत करण्याचे भाग्य मला लाभले याचा विशेष आनंद झाला.ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या कोपरगाव नगरीत प.पू.१०८ मुनिश्री अक्षयसागरजी महाराज यांनी ससंघ पवित्र चातुर्मासाचा काळ व्यतित करावा,अशी नम्रतापूर्वक विनंती यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली.

याप्रसंगी मुनिश्रींचे प्रवचन व गुरू भक्तीचा कार्यक्रम पार पडला. कैलासशेठ ठोळे,अजितशेठ लोहाडे, दिलीपशेठ अजमेरे,पंच महावीर दगडे, पंच अशोक पापडीवाल,माजी नगरसेवक अतुलशेठ काले,सचिन अजमेरे, महावीर काले,नितीन कासलीवाल,राजाभाऊ अजमेरे, अजित काले,परेश पांडे,विशाल ठोळे, संतोष गंगवाल,डॉ.मयुर गंगवाल, राजाभाऊ गंगवाल, सी.डी.ठोळे,नीरज कासलीवाल,अशोक गंगवाल,आनंद काले,अमित लोहाडे,मोहित गंगवाल, अक्षद अजमेरे,सुयोग ठोळे,प्रीतम गंगवाल,पंकज ठोळे,योगेश ठोळे, जितेंद्र पाटणी,योगेश गंगवाल,सुमित लोहाडे,निरंजन गंगवाल,अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, संचालक गोपीनाथ गायकवाड,भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, शिवसेनेचे नेते कैलास जाधव,संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,स्वप्नील निखाडे,महेंद्र नाईकवाडे,पप्पू पडियार, रंजन जाधव,सत्येन मुंदडा,ज्ञानेश्वर गोसावी,गोरख देवडे,शंकर बिर्हाडे, संजय खरोटे,सागर जाधव,सुजल चंदनशिव,अनिल जाधव,खलिकभाई कुरेशी,रवींद्र रोहमारे,वैभव आढाव, सिद्धार्थ साठे,रोहित कनगरे आदींसह जैन समाजबांधव,भगिनी,व्यापारी, उद्योजक,भाजप,शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!