
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
वर्षेभरात अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात आणि शिक्षक,जेष्ठ नागरिक,महिला,परिचारिका,पत्रकार, अभियंता आदींच्या सन्मानाने श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीने समाजात आपले एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.संस्थेचे चेअरमन प्रशांत भालेराव यांच्या दुरदृष्टी विचाराने संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत असे विचार सामाजिक कार्यकर्ते दिनकर खरे यांनी व्यक्त केले.

बंब प्लाझा येथील श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या वतीने योगेश चंद्रकांत भालेराव यांच्या जयंती निमित्त ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बचतीचे महत्त्व,आर्थिक नियोजन,भविष्यात जगण्याची कला विषद केली.
जयंती निमित्त कोळपेवाडी येथील हौशीराम वाघडकर,भास्कर नरोडे, मदन मंटाला,आदिंसह खातेदार, ठेविदार उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक प्रल्हाद वाघ यांनी केले. आभार शुभांगी दीक्षीत यांनी मानले