Homeकोपरगावनियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची आजही प्रतीक्षाच,अतिवृष्टी अनुदान मिळेना,दोन...

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची आजही प्रतीक्षाच,अतिवृष्टी अनुदान मिळेना,दोन लाखाच्यावरती कर्जमाफी हवेत विरली – लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान सरकारने जाहीर केले मात्र,अनेक शेतकरी या अनुदानापासून अजूनही वंचित आहेत.तर दोन लाखाच्या वरती कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीत विचार करणार असल्याचे संकेत सरकारकडून मिळाले होते मात्र,ते शेतकरी अद्याप आजपर्यंत या कर्जमाफीच्या आशेवर जगत आहे.तर,मागच्या खरिपामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात झालेल्या नुकसानीचेअनुदान सरकारने जाहीर केले.मात्र,अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले दिसत नाही.नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पन्नास हजार रुपये मिळाले नाही तर दोन लाखाच्या वरती कर्जमाफी हवेतच विरली आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत असे आवाहन कुंभारीचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आपल्या पत्रकात पुढे श्री.घुले म्हणाले कि,कोपरगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी व नियमित कर्जाची परतफेड करणारे अनेक शेतकरी असून त्यांना महाविकास आघाडी शासनाने प्रत्येकी पन्नास हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.मात्र ती रक्कम काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही,तरी ती अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावीअशी मागणी कुंभारी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना सोसायटीचे कर्ज, राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज भरण्याची मुदत 30 जूनपर्यंतअसते.मात्र,अद्यापही शासनाचे पैसे मिळालेले नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कर्ज भरायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे,तरी लवकरात लवकर शासनाने अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करावे.

मागील हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला त्यामुळे त्यांचे हातून खरिपाचे पीक वाया गेले होते तर रब्बी हंगामाचे पीक उभे करताना त्यांना खूप मोठी कसरत करावी लागली होती,कसरत करून उभी असलेल्या कांद्यासह अनेक पिकांचे ठिक ठिकाणी गारपीटीमुळे नुकसान झाले आहे.खरीपाची पीक उभे करताना त्यांना पैशाची जमवा – जमव करताना अतोनात हाल झाले, याचा विचार सरकारने करावा व लवकरात लवकर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनामध्ये, ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखावरील कर्ज होते त्यांना अद्यापही माफी दिली नाही व उर्वरित पन्नास हजार प्रस्थान पर अनुदान देणार होते त्याचाही बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही.

शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही कापसाला भाव नाही.शेतकऱ्याला माल मातीमोल भावात विकावा लागत आहे.”कापूस पडला शेतकऱ्यांच्या घरी कांदा पडला बांधावरती “सरकार म्हणते, ”शासन आपल्या दारी “अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जीवन कसं जगायचं हे सरकारला केव्हा कळेल, शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम तात्काळ जमा करून शासनाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात शेवटी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!