Homeकोपरगावपोलीस पाटलांवर होणारे भ्याड हल्ले व क्रूर हत्यां बाबत राज्याचे महसुल मंत्री...

पोलीस पाटलांवर होणारे भ्याड हल्ले व क्रूर हत्यां बाबत राज्याचे महसुल मंत्री यांचेकडे पोलीस पाटील संघटनेच्या वतीने निवेदन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

खेडेगावात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती व पोलीसांना मदत करणारी दुवा म्हणजे पोलीस पाटील होय. पोलिस पाटील हे शासनाच्या सर्व विभागाचे गावपातळीवर समन्वयक म्हणुन काम करणारे पदसिध्द पदाधिकारी आहेत.त्यांना २४ तास सतर्क राहावे लागते.शासनाच्या विविध विभागाचे काम संपुर्ण जबाबदारीने व गोपनियता ठेवून कार्यतत्परतेने करत असतात.कर्तव्य बजावत असतांना गावातील गावकऱ्यांशी समन्वय व कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी कधी कधी कठोर निर्णय देखील त्यांना घ्यावे लागतात.कित्येक वेळा गैरसमजातून गावकऱ्यांकडून पाटलांवर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आल्याचे प्रकारही अलिकडे वाढत चालले आसल्याचे त्यांनी आपल्या निवेदना म्हटले आहे.

पुढे त्यांनी दिलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे कि,मागील आठवडयात गैरसमजातून कोल्हापूर जिल्हयातील चंदगड तालुक्यात पोवाची वाडी येथील संदिप ज्ञानदेव पाटील यांची हल्ला करून निघुर्ण हत्या करण्यात आली तर धाराशिव जिल्हयातील कळंब तालुक्यात खेरडा येथीलअजित जाधव यांनी शासकिय कामात मदत केल्याने आरोपीकडून भ्याड हल्ला करण्यात आला त्यामध्ये त्यांना जबर मार लागून ते जखमी झाले होते.असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी वरील प्रकरणातील संबंधीत आरोपीवर महसुल मंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन तात्काळ कठोरात कठोर कायदेशिर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटलांचे मागण्यांबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन विविध मागण्यां बाबतचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा यासाठी दि.३० जुन२०२३ रोजी कोपरगाव येथे महसूलमंत्री नामदार मा.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पोलीस पाटील सेवाभावी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,कोपरगाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

.

यावेळी महसुल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी येत्या काही कालावधीतच पोलीस पाटलांच्या मागण्याबाबत सकारात्मक चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार असून लवकरात लवकर पोलीस पाटलांना भरघोस मानधन तसेच उर्वरित मागण्यांवर विचार केला जाईल अशी ग्वाही दिली व पुढे ते म्हणाले कि,मागील मंत्रिमंडळात याविषयी
प्राथमिक चर्चा झाली असून त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सदर प्रसंगी पोलिस पाटील संघटनेच्या वतीने,पोलीस पाटील पंडित पवार हिंगणी,बाबासाहेब गायकवाड जेऊर कुंभारी,निळोबा रणशूर धारणगाव व दगुराव गुढगे सोनेवाडी यांसह आदि पोलीस पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!