
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यातील मळेगांवथडी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे धनंजय बडदे तर उपाध्यक्षपदी सौ. कमलबाई आबासाहेब दवंगे यांची निवडणुक निर्णय अधिकारी तथा तालुका सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी संचालक सर्वश्री.संतोष दवंगे,सखाहरी उगले,अशोक गाडे, बाजीराव दवंगे,शांताराम दवंगे,रमेश उगले,सुखदेव शिंदे,सचिन चंद्रे,अनंत दवंगे,गोकुळ मोरे,इंदुबाई खोंड, भाउराव माळी यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी मावळते अध्यक्ष रमेश उगले व उपाध्यक्षा इंदुबाई खोंड यांच्यासह नवनिर्वाचित अध्यक्ष धनंजय बडदे, उपाध्यक्ष कमलाबाई दवंगे यांचा सत्कार करण्यांत आला.सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष धनंजय बडदे म्हणाले की,जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली सभासद शेतक-यांसाठी असणा-या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करू.सुत्रसंचलन व आभार सचिव शिवाजीराव दवंगे यांनी मानले.