Homeकोपरगावगरजवंतांच्या वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदतीसाठी…येथे गीतमैफल संपन्न

गरजवंतांच्या वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदतीसाठी…येथे गीतमैफल संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : गरीब व गरजवंतांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक आधार देण्याचे काम कोल्हापूर येथील चंद्रशेखर फडणीस,दिलीप माळी, नाट्यकर्मी प्रशांत जोशी या मित्रांनी स्नेहसंगीत प्रतिज्ञा या चॅरीटी शो चे आयोजन करून आर्थिक मदत जमा करण्यासाठी नाविन्यपूर्ण असा कौतुकास्पद उपक्रम राबवून उपचारासाठी रूग्णांना मदत केली जाते.

योग साधना शिक्षीका सौ.वृंदा कोऱ्हाळकर यांच्या सहकार्याने शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रम,साई आश्रया अनाथाश्रम,मनकेंद्र,कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंच व महिला समितीच्यावतीने गीतमैफलीचे आयोजन करण्यात आले होते.स्वागत व प्रास्ताविक सौ वृंदा कोऱ्हाळकर यांनी केले.तर जेष्ठ नागरिकांनी केलेल्या फर्माईशनुसार मैफल रंगली.

या प्रसंगी अनेक दानशूर दात्यांकडुन गरजवंतांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मैफल सादर करणाऱ्या कलावंतांचा सेवा मंचच्यावतीने सन्मान करण्यात आला.या प्रसंगी कार्याध्यक्ष विजय बंब,उत्तम भाई शहा, डॉ.विलास आचारी,अॅड पुनम गुजराथी,संगीत विद्यालयाचे केतन कुलकर्णी त्याचबरोबर जेष्ठ नागरिक सेवा मंचचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते,तर शेवटी डॉ.विलास आचारी यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!