

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : भारतीयांच्या मनात आपल्या देशाप्रति अभिमान व देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारकडून गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही‘हर घर तिरंगा’अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात भारतीय डाक अर्थात टपाल विभागानेही हिरीरीने सहभाग नोंदवला असून,या अभियानांतर्गत श्रीरामपूर विभागाचे डाक अधीक्षक हेमंत खडकीकर यांच्या मार्गदर्शना खाली कोपरगाव येथील डाक निरीक्षक अनंत सोनवणे यांच्या हस्ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांना तिरंगा ध्वज देण्यात आला.
मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गतवर्षी देशभर‘हर घर तिरंगा’अभियान राबविण्यात आले होते.प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकावण्यात आला होता.यावर्षी देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर‘मेरी माटी, मेरा देश’अर्थात‘माझी माती,माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त यंदाही’हर घर तिरंगा’हे अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे.देशाचा तिरंगा ध्वज हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.प्रत्येक भारतीयाचे आपल्या राष्ट्रध्वजाशी भावनिक नाते आहे. त्यामुळे १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येकाने आपल्या घरावर, कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकावून‘हर घर तिरंगा’अभियानात सहभागी व्हावे,असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले आहे. त्यानुसार भारतीय डाक विभागाच्या वतीने‘हर घर तिरंगा’अभियान राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (१३ ऑगस्ट) कोपरगाव येथे माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांना कोपरगाव येथील डाक निरीक्षक अनंत सोनवणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज सुपुर्त करण्यात आला.
या वेळी डाक मेल ओवरसियर अर्जुन मोरे,संजय ढेपले,तक्रार नोंदणी विभागाचे प्रमुख विनायक शिंदे, पोस्टमास्तर विशाल गवळी,रवींद्र परदेशी, संवत्सर ब्रँच पोस्टमास्तर दत्तात्रय गायकवाड,किशोर दिघे,राहुल आढाव, जीवन पावडी,बाळासाहेब आहेर,हौशिराम भिंगारे,राजू भागवत,अक्रम शेख,आकाश जोर्वेकर आदी टपाल विभागाचे कर्मचारी,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.