
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त कोपरगाव तालुक्यातील क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन आणि विराट प्रतिष्ठान कोपरगाव शाखेच्या वतीने शाखा अध्यक्ष श्री.अनिल भोलेनाथ पगारे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्राचे लाडके गायक रणजित खडांगळे व नानाभाऊ वीर यांचे सुर संगीतमय गायन,लावणी सम्राट किरण कोरे यांचा सदाबहार लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रथमतःडॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्या नंतर प्रमुख पाहुणे क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखरकारखान्याचे संचालक रमेश घोडेराव, कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी नगरसेवक रवींद्र पाठक,शिवाजी खांडेकर तसेच विराट प्रतिष्ठानचे निलेश सरोदे,निलेश जाधव ॲड.नितीन पोळ,शिंगवे येथील सरपंच प्रशांत काळवाघे,शरद त्रिभुवन,पंडित भारुड.विजुभाऊ दोडके,भोलेनाथ पगारे,संजय खैरनार.रवी सानप,योगेश जाधव,विशाल बकुरे,सुखदेव जाधव, सुदाम कांबळे,भागिनाथ कांबळे,जंगू अण्णा मरसाळे,पोलीस पाटील मा. संदीप कांबळे,प्रकाश सोळशे,विकास अस्वार,गोपी घोरपडे,नितीन वाकळे, महेश पंडोरे,शुभम रोकडे,राहुल गुडेकर,आतिश पगारे,अनिल कांबळे, प्रभुदास पाखरे,प्रदीप गायकवाड, सुमित पगारे,संतोष पगारे,काका पगारे आदी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन,कोपरगाव शाखा अध्यक्ष श्री.अनिल पगारे यांनी केले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन श्री.विवेक कोल्हे,विराट प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप सरोदे यांचे या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवी डोलारे,सचिन साळवे,मयुर साळवे,अमोल पगारे, दावल कांबळे आदींसह क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन आणि विराट प्रतिष्ठान कोपरगाव शाखेचे पदाधिकारी, सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.कोपरगाव शहर आणि तालुक्यातील समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार गणेश कांबळे यांनी मानले.