Homeकोपरगावसत्यशोधक लहुजी क्रांती सेना संघटनेचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांचा खासदारांच्या...

सत्यशोधक लहुजी क्रांती सेना संघटनेचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांचा खासदारांच्या हस्ते सत्कार

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव तालुक्यातील मातंग सामाजाप्रती असणारी तळमळ व त्याच जोमाने समाजासाठी आपली बाजी पणाला लावून,वंचित घटकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र काम करणारे मातंग समाजाचे श्री.फकिरा चंदनशिव यांची सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेने नुकतीच उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी फकिरा चंदनशिव यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.श्री.सदाशिव जी लोखंडे साहेब यांच्या हस्ते दिं.१५ ऑगष्ट २०२३ रोजी कोपरगाव येथे कार्यकर्ता मेळावा प्रसंगी त्यांचा श्रीफळ,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मा.खासदार सदाशिव जी लोखंडे साहेब,कमलाकर कोते, रावसाहेब थोरात,शिवसेना शहरप्रमुख अक्षय जाधव,विमलताई पुंड यांसह विविधि पदाधिकारी,महिला भगिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!