
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.सदाशिव जी लोखंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे दि.१५ऑगष्ट २०२३ रोजी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.

यावेळी कोपरगावचे शिवसेना उपतालुका प्रमुखपदी निलेश चौधरी धारणगाव,उपशहर प्रमुखपदी निलेश पवार हनुमाननगर,संदिप डुमरे लिंभारा मैदान,संदिप बिडवे गांधीनगर,कृष्णा पवार लक्ष्मीनगर,मनोज राठोड येवला नाका यांची तर सोनल चोरघे महिला आघाडी प्रमुखपदी, मिनाक्षी वाकचौरे युवती सेना प्रमुखपदी,तर शहर संघटकपदी विनोद गलांडे अन्नपुर्णा नगर,कार्तिक जोगदंड मुर्शतपूर यांची, हमाल पंचायत संघटना प्रमुखपदी चेतन मरसाळे,अनिल बोर्डे उपप्रमुख पदी,अमोल मरसाळे ब्राम्हणगाव यांची ओबीसी सेल प्रमुखपदी तर युवा सेना उपशहरप्रमुखपदी ऋषिकेश बारहाते इंदिरा पथ कॉलनी,वैभव कुऱ्हाडे दत्तनगर,विजय नरोडे लक्ष्मीनगर, संकेत मंडलीक सोनार गल्ली यांची, शिव विद्यार्थी सेना पदी भारत कुऱ्हाडे संजीवनी,साहिल तांबे लक्ष्मीनगर यांची तर साईश वाकचौरे निवारा रोड, प्रसाद खिल्लारी गांधीनगर यांची सोशल मिडीया प्रभारीपदी नियुक्त्या करण्यात आल्या आहे.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना खासदार मा.लोखंडे साहेब म्हणाले कि,१९९५पासून मी आमदार होतो त्यांनंतर २o१४ ला मी दानाच्या रूपाने खासदार झालो व २०१९ला सर्वांच्या आशिर्वादाने आपण सर्वांनी मला पून्हा संधी दिली आणि आता २०२४ ची निवडणूक आपल्या मतदारांच्या हातात आहे.परंतु,जनतेचे चांगले काम केले तर जनता डोळे झाकूण मतदान करतात याची मला प्रचिती आली असल्याचे खा.सदाशिवजी लोखंडे साहेब यांनी सांगितले,पुढे बोलतांना ते म्हणाले कि,आजपर्यंत निवडणुकीत मी कधी देशी दारू वाटली नाही किंवा कोणाला एक रुपयाही दिला नाही, फक्त आणि फक्त गोरगरीब जनतेचे कोणतेही काम असो ते हाती घेऊन पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय थांबलो नाही, आणि निवडणुकीत पैसे न देणाऱ्या माणसाला कसलीही चिंता नसते असे त्यांनी दिलखुलासपणे सांगितले.
पुढे ते म्हणाले,१९९५ला मी आमदार असतांना आमचे नेते सुर्यभान पाटील वहाडणे होते त्यांच्याकडे कोपरगावला यावे लागत होते,त्यावेळी जे वैभव कोपरगावला होते ते आज राहीले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मागच्या बैठकीत मी सीईओंना विचारले कोपरगावच्या बागायत पट्टयात शहराला पिण्याचे पाणी बारा दिवसा नंतर मिळते याचे कारण काय ? हे फार मोठे दुर्भाग्य आहे,तर येथील पाणी गेले कोठे,ब्रिटिशांनी आपल्याला न्याय दिला होता,तो आपल्या सरकारने घालवलेला आहे अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.२०१४ ला खासदार झाल्यानंतर पहिले शेतकरी हित लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाकिसान संघची निर्मिती केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपला तयार झालेला माल डायरेक्ट कंपनीला देऊन जास्तीत जास्त नफा शेतकऱ्यांला झाला पाहिजे यासाठी शेतकरी प्रोड्युसन्स कंपनी शिर्डी लोकसभा मतदार संघात काढलेली आहे.त्याचबरोबर कोपरगाव शहराला ओपन जिम,सभामंडप, योग साधना महिलासाठी योग भवन यासारख्या सुविधा गरजेच्या आहे, आता मतदार सुज्ञ झालेला आहे कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही २०१४च्या निवडणुकीत मी काय मतदारांना चपटी देऊन किंवा पैसे देऊन खासदार झालेलो नाही,जनतेचे चांगले कामे वेळेवर करावी लागतात आणि जेथे जेथे अडचणीचे कामे असेल तेथेच ते सोडविण्याची भूमिका ठेवली पाहीजे,तेव्हा जनता आपल्या पाठीशी ठाम उभी रहाते असेही मत त्यांनी शेवटी मांडले आहे.यावेळी जिल्हाप्रमुख मा.कमलाकर कोते यांसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,महिला जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे,कोपरगाव तालुकाप्रमुख रावसाहेब (आण्णा) थोरात,उपजिल्हाप्रमुख देवा भाऊ लोखंडे,शेतकरी सेना तालुका प्रमुख बाबासाहेब बढे,संघटक विजय काळे, कोपरगाव शहर प्रमुख अक्षय जाधव, अनिल नरोडे,बाळासाहेब मापारी,सनी गायकवाड,योग साधना महिला ग्रुप व आजी -माजी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला भगिनी व शिवसेना प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक रावसाहेब (आण्णा) थोरात यांनी केले तर शेवटी आभार कोपरगाव शहरप्रमुख अक्षय जाधव यांनी मानले.