Homeकोपरगावशक्ती केंद्र सशक्तीकरण बैठकीतुन भाजपा संपर्क मोहिम प्रभावी करावी-स्नेहलता कोल्हे.

शक्ती केंद्र सशक्तीकरण बैठकीतुन भाजपा संपर्क मोहिम प्रभावी करावी-स्नेहलता कोल्हे.

अहमदनगर उत्तर जिल्हा भाजपा शक्तीप्रमुख,केंद्र प्रमुख पदाधिकारी,विविध सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते,आजी माजी पदाधिकारी यांची बैठक कोपरगाव येथे रविवारी सपन्न झाली त्यात प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना समवेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर

संपादक-राजेंद्र तासकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधुन भारतीय जनता पक्षाची विचारधारा जनसामान्यापर्यंत रूजविण्यांचा प्रयत्न केला असुन पक्ष संघटन मजबुत करतांना कार्यकर्त्यांनी मिळालेल्या जबाबदारीनुसार शक्ती केंद्र सशक्तीकरणातुन भाजपा संपर्क मोहिम प्रभावी करावी असे प्रतिपादन प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
अहमदनगर उत्तर जिल्हा भाजपा शक्तीप्रमुख,केंद्र प्रमुख,विविध सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी यांची बैठक कोपरगांव येथे रविवारी संपन्न झाली त्यात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.उत्तर नगर जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर हे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी भाजपाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले,भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक,महिला तालुकाध्यक्षा वैशाली साळुंके,शहराध्यक्षा वैशाली आढाव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले.जिल्हा ओबीसी अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर,दिव्यांग तालुकाध्यक्ष मुकूंद काळे, बाळासाहेब अहिरे,हरिभाउ लोहकणे,चंद्रभान रोहाम,डॉ. देसाई,संदिप देवकर,आदिंची भाषणे झाली.
सौ.स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की,राज्यात सध्या महाविकास आघाडी शासन व त्यांचे जबाबदार मंत्री भाजपाची ताकद मोडु पहात आहे.केंद्र सरकारविरूध्द चिखलफेक करून विकासापासून लक्ष विचलीत करण्यांचा त्यांचा डाव आहे.विरोधी पक्ष नेत्यांवरही नको ते तोंडसुख घेवुन एक दबावतंत्र निर्माण करण्यांच्या हालचाली सुरू आहे तेंव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला प्राधान्य देवुन आगामी जिल्हा परिषद,पंचायत समित्या निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेवुन बुथनिहाय मतदार जोडण्यासाठी जास्तीत जास्त सतर्क रहावे.कोपरगांव विधानसभा मतदार संघातील घरकुले,रेशनकार्ड,दुबार रेशन कार्ड,संजय गांधी निराधार, आदिवासीसह अन्य गरजुंचे जातीचे दाखले,सिंचन पाटपाणी, शहरवासियांचे पिण्यांचे पाणी, रस्ते,वीज,आरोग्य,विविध गावच्या पाणी योजना,तरूण युवकासह विद्यार्थ्याचे,महिला बचतगट, कोरोना महामारीमुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या वारसांचे सानुग्रह अनुदान,निळवंडे, गोदावरी कालवे निर्मीती व दुरूस्ती,ठिबक सिंचन,पुरग्रस्त नुकसान भरपाई रक्कम,विमा, शेती आणि शेतकरी,धोंडेवाडी अतिक्रमण पुर्नवसन,वीज रोहित्र यासह कित्येक किरकोळ प्रश्नांची सोडवणुक होत नाही फक्त महाविकास आघाडी शासनाच्या पोकळ घोषणांची आठवण करून दिली जाते.समाजमाध्यमातुन विकासाचे आभासी चित्र रंगवुन मतदारांचे कित्येक वर्षाचे प्रलंबित असलेल्या कामाची सोडवणुक केली म्हणून साईबाबांच्या नावाने खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे,याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८०कोटी नागरिकांना कोरोना महामारीत मोफत अन्नधान्य पुरवठा करून केंद्र शासनामार्फत कोटयावधी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे तेव्हा नागरिकांनी गाव ते तालुका यातील कुठल्याही निवडणुकीत गोबेल्स नितीला बळी न पडता भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करून विरोधकांना चपराक द्यावी असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षपदावरून बोलतांना राजेंद्र गोंदकर म्हणाले की,कार्यकत्यांनी बुधनिहाय संघटन वाढवुन भाजपामार्फत होत असलेल्या कामाची आठवण करून देत उपेक्षीतांचे प्रश्न सोडविण्यासाठी तागाळातील घटकापर्यंत पोहोचावे.शेवटी श्री.बिडवे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!