
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :महिलांची महाराष्ट्रीयन वेशभूषा नथी शिवाय पुर्ण होतचं नाही, स्त्रीच्या सौंदर्यामध्ये नथीमुळे भर पडते.सध्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या नथीचे डिझाइन ट्रेंड सुरु असुन कोपरगांव शहरात देखील नुकतीच महाराष्ट्रियन नथ बनवण्याची कार्यशाला पार पडली,या कार्यशाळेला महिलांसह युवतींचा देखील उस्फुर्त प्रतिसाद लाभला.अगदी पुर्वपरंपरे नुसार नववारी साड़ी आणि त्यावर सोन्याची नथ हे कॉम्बिनेशन दिसून येत होते,पण आता अनेक प्रकारच्या नथीचे डिझाइन दिसून येतात, बाजीराव मस्तानी या चित्रपटा नंतर नथीच्या डिझाइनला महिला वर्गात जोरदार मागणी आहे,सुंदर चेहऱ्यावर भरगच्च नथ त्यावर मोती आणि खड्याचे कोंदन त्यामध्ये पुणेरी नथ,पेशवाई नथ,बानू नथ,हिऱ्याची नथ, पाचूची नथ,नावाची नथ,सायली सूर्या इत्यादी विविध प्रकारच्या नथी बनवण्याचे प्रशिक्षण तसेच मार्केटिंगची माहिती यावेळी नीलम क्रिएशन मार्फत देण्यात आली,नवरीच्या पेहरावात देखील नथ महत्वाची ठरते,सुंदर नथीने चेहरा अत्यंत भरगच्च अधिक लक्षवेधी व आकर्षक दिसतो,लग्न, सण उत्सव, समारंभामध्ये लेटेस्ट नथीचा ट्रेंड सुरु असुन महिलांकडून वेगवेगळ्या नथीची मागणी वाढत असल्याचे प्रशिक्षिका सौ.नीलम कानडे यांनी यावेळी सांगितले.पारंपरिक दागिन्यांमध्ये महाराष्ट्रीयन नथीला विशेष महत्व आहे,नव्या नवरीला त्या मराठमोळ्या शोभिवंत लुक देतात,सध्या हा एक ट्रेंड म्हणून प्रसिद्ध असुन तो महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, महाराष्ट्रीयन नथींना मुखडा असेही म्हणतात,संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा या नथीच्या रंगात,साहित्यात आणि गुणवत्तेत दिसून येते,नथ हा अलंकार स्रियांचा आवडता दागिना आहे,हिंदु संस्कृतीत नथ फक्त नखरा नसून वैज्ञानिक दृष्टिनेही तिचे महत्व आहे.फॅशन ट्रेंडकडे लक्ष्य दिल तर,जुन्याच फॅशनचे नूतनीकरण होवून तेच ट्रेंड पुन्हा येत असतात.प्रत्येक वेशभुषेवर तिला वेशभुषेप्रमाणे स्वतःला शोभनारा दागिना म्हणजे नथ,पूर्वीच्या काळी नथ मानाचे व सौंदर्याच लक्षण समजले जायचे.मॉडर्न फॅशननुसार नथीचा नखरा म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या या नथीच्या वापरामागे काही शास्त्रीय कारणे देखील आहेत.
आज महाराष्ट्र भर चंद्रकोर प्रमाणे दिसणारी मोत्यांची नथ नाकाच्या डाव्या नासिकेत घालतात,आयुर्वेदा प्रमाणे स्रियांच्या डाव्या नासिकेतुन जाणाऱ्या काही रक्त वाहिन्या गर्भाशयाशी जोडलेल्या असतात व त्यामुळे त्या बिंदूवर टोचवुन घेतल्यामुळे स्त्रियांना प्रसूतीवेदना कमी होते व प्रजननाशी संबंधित सगळे अवयव सदृढ़ राहतात असे म्हटले आहे,सुश्रुत संहिता अध्याय १९ चिकित्सा स्थाननुसार नाक टोचवूंन घेतल्याने बाळंतपन सोपे होण्या व्यतिरिक्त स्रियांचे व ऋतू प्राप्ती झालेल्या मूलीचे नाक टोचल्याने त्यांना मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्राव होणे,पोटदुखी,कंम्बरदुखी,अनीमिया होणे इत्यादी कमी होते तसेच हातपाय वाकडे होणे,शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषली जाते,त्यामुळे उष्णते मुळे होणारे आजार पित्त खवळने, अंगावर फोड़ फुटकूळ्या येणे, हातापायाला भेगा पडणे,नाक फुटुन रक्तस्त्राव होणे हे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतात तसेच सोन्याची किंवा चांदीची नथ घातल्याने त्यांच्यात जटपट होणारे मुड़ स्विगज कमी होवू शकतात,नकारात्मक विचार कमी होवून कंसेंट्रशन वाढते,असे म्हणतात की,नथ ही मुळची भारतीय नाही कारण आपली वैज्ञानिक पुस्तके,पुराण इत्यादी नथीबद्दल काहीच सांगत नाहीत,ते नथीविषयी मौन आहेत, त्यामुळे नथ ही नक्की आपल्याकडची आहे का ? हे ठोस सांगणे जरा कठीणच. याउलट मुगल इतिहासात नथी ची नोंद मात्र मिळते काही इतिहास करांच असं मत आहे की,नथ ही मध्य पूर्वेतुन जेव्हा मुगल भारतात आले, त्यांच्याबरोबर भारतात आली आणि भारतीय अलंकारापैकी एक बनली. नऊवारी,सहावरी,जीन्स, सलवार,कमीज किंवा वन पीस अगदी कशावरही नथ घातली जाते,ढोलताशा पथकामध्ये तर डोक्यावर फेटा,नाकात नथ आणि हातात ढोल हे समीकरण बघणाऱ्यांचे डोळ्यांचे पारणे फेडते.
आता श्रावण महीना सुरू असुन त्यासोबत असंख्य अशा मराठीसणांची रेलचेल सुरु आहे,सण म्हटले की काठ पदरच्या साड्या आणि त्यावर सुंदर अशी नथ आलीच,भारतीय संस्कृतीत सोळा श्रृंगाराला अतिशय महत्व दिले आहे,नथ हा नासिका भूषणातील एक महत्वाचा प्रकार असुन हिंदु स्रियांत ती सौभाग्यलंकार म्हणूनच रूढ़ होवून बसली आहे,तथापी नथ शब्दाऐवजी दहाव्या शतका नंतरच्या संस्कृती साहित्यात मसगमोवतीक, नासामुक्ताफल असे उल्लेख आढळतात,त्यामुळे नवव्या दहाव्या शतकानंतरच भारतात नथ हा अलंकार मुसलमानाच्या संपर्काने आला असण्याची शक्यता काही विद्वनांनी दर्शविलेली आहे,परकीय आक्रमणासोबत भारतात दाखल झाली आणि संस्कृती देवाण घेवाण च्या माध्यमातुन आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली व पेशवाई च्या कालखंडात नथीला वैभव प्राप्त झाले.कारण,सत्ता स्थिरस्तवर होवून आर्थिक संपन्नता प्राप्त झाली होती. त्यामुळे विविध मोती,खड़े यांचा वापर केला जावू लागला,इतर दागिन्यांच्या मानाने याचा आकार व प्रकार मर्यादितआहेत, त्यापैकी नथ,चमकी,बुलाल, बेसर,लवंग,लटकन घुंगी,बाला,फुली, कतिया, मोरपंखी,संपानगी,मौनरिया व पोगुल इ.प्रकार प्रदेश परेत्व विशेष प्रचलित आहेत.सामान्यतः सोने,चांदी, तांबे,पितळ इ.धातु त्याचप्रमाणे जड़व कामासाठी हिरे,माणिक,मोती इ. मौल्यवान रत्न यांचा वापर करण्यात येतो,चमकी हा नासिका भूषणामध्ये आकाराणे सर्वात लहान असा प्रकार असुन तो सोन्यावर रवे पाडून तयार करण्यात येतो.महाराष्ट्रियन स्त्रीयां डाव्या नाकपुड़ीत तर दक्षिणात्य स्त्रीयां सामान्यतः उजव्या नाकपुड़ीत घालण्याची रूढी आढळते,नथीला मुखरा असेही म्हणतात.घुंग्री हे चमकी प्रमाणे पण संकीर्ण आकृतीबंधाचे नासिका भूषण असुन त्याचा वापर विशेषतः नेपाळी व सिक्किम स्त्रीयां करतात, महाराष्ट्रात सोन्याचा फ़ासा असलेल्या तारेत सात किवा अधिक मोती मधोमध लाल रत्न बसवलेली असे नथीचे स्वरूप असते,पोगुल हे नासिका भूषण जवळजवळ नथी सारखेच असुन कोरोमंडलच्या किनाऱ्या वरील पुरुषही त्याचा वापर करतात,बाला ह्या नासिका भूषणाचा आकार चंद्रकोर सदृश असुन त्याला मोत्यांचे झुपके लावलेले असतात.त्याचा वापर लाहोर भागातील स्रियांमध्ये आढळतो,नथ व तिच्या भोवती पूर्णाकार बुलाल हे कुलू प्रदेशातील स्रियांच एक वैशिष्ट्यपूर्ण नासिकाभूषण आहे,मौनरिया हे राजस्थानी नासिकाभुषण म्हणजे मोठ्या आकाराचे गोल कड़ेच त्याचा आकार व सजावट पुष्पगुच्छ सदृश असते,कश्मीर मधील नासिकाभूषणात मात्र नक्षीकाम व कलाकुसर बरीच केलेली असुन त्याला गोंडे लावलेले असतात.म्हणूनच या नथीला महाराष्ट्रासह इतर राज्यातही स्त्रीयांच्या सौंदर्यातील महत्वाचा घटक म्हणून तिला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.