Homeकोपरगावप्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्याचे …. यांना दिले निवेदन

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्याचे …. यांना दिले निवेदन

संपादक – राजेंद्र तासकर

          राज्यमंत्री मा.नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे सौ.कुलकर्णी मॅडम नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले व मा.तहसिलदार विजय बोरूडे साहेब यांचे बरोबर भ्रमणध्वनी वरून चर्चा करण्यात आली आहे.
       यावेळी जिल्हा संघटक परमेश्वर कराळे सर, प्रविण भुजाडे कोपरगाव शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष शरद खिलारी, अक्षय रत्नापारखी तालुका उपाध्यक्ष,जेष्ठ संघटक सर्जेराव गवारे,रवि आढाव,मुजिद शेख, सागर संवत्सरकर, सुर्यभान घाटेकर,बालम शेख,भाऊसाहेब पानगव्हाणे,संगिताताई चोरघे, बाळासाहेब सक्ताटे,देविदास शिंदे, भाऊसाहेब चोरघे असे अनेक  दिव्यांग बहुसंख्येने निवेदन देतांना  उपस्थित होते.
    निवेदनात पुढे म्हटले कि, दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनुदानाची रक्कम वेळेत त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दर महिन्याला जमा करण्यात यावी तसेच शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता गरजू दिव्यांगांना विना अट घरकुला मध्ये समावेश करुन घेण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
     ग्रामीण भागातील अनेक दिव्यांग घरकुलापासून वंचित असून शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक गावातील दिव्यांगांचा घरकुलामध्ये 3% समावेश करण्यात येऊन मुलभुत गरजांपैकी निवाऱ्याची गरज पूर्ण करून  दिव्यांगांना दिलासा देण्यात द्यावा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!