
नुसते मार्च एन्डला बिले काढण्यासाठी काम न करता उच्च दर्जाचे झाले पाहिजे व केले पाहिजे -माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव शहरातील अति महत्वाच्या दळणवळणाचे रस्ते म्हणुन संबोधल्या जाणारे संभाजी महाराज पुतळा ते गोकुळनगरी ते टाकळी नाका ( इंदिरा पथ), बेट नाका ते तांडेल बंगला,के.जे. सोमय्या कॉलेज गेट ते मौनगिरी पुल(लहान पुल),पंचायत समिती ठोळे निवास ते आठरे बंगला या चाळणी झालेल्या व खड्डेमय, धुळयुक्त, दुरावस्था झालेल्या रस्त्यांचे कामे नगरपालिका कधी करणार ? असा सवाल माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला.
गुरुद्वारा रोड तहसील कचेरी पर्यंतच केला व पुढील रस्ता अर्धवट सोडुन दिला... शहरातील एकही रस्ता व्यवस्थित पूर्ण केला जात नाही त्यामुळे शहर धुळमय झाले आहे, धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे व डोळ्याचे विकार होत आहे.त्याचबरोबर दुचाकी स्वरांना मान व मणक्यांचे आजार जडत आहे, खड्यांमुळे वाहनांचा दुरुस्तीचा भुर्दंड जनतेला सहन करावा लागत आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पाटील पुढे म्हणाले कि,धारणगाव रस्त्याचे काम हे खूप धीम्या गतीने चालू आहे,त्याचा स्पीड वाढवून तो जलद गतीने करण्यात यावा. एक -एक ऱस्त्याचे काम पूर्ण करून साईड पट्यांना पेविंग ब्लॉक बसविण्यात यावे.
नगरपालिकेची मुदत संपलेली असुन नगरपालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामात लक्ष्य घालुन उच्चदर्जाची कामे लवकरात लवकर करून घेऊन जनतेला होणाऱ्या त्रासातून सुटकारा द्यावा अशी विनंती शेवटी नगरपालिकेला मंगेश पाटील यांनी केली आहे.